Video : धोनीला भेटायला आजीबाई पोहचल्या मैदानात

महेंद्रसिंग धोनी सिडनीच्या क्रिकेट मैदानात सराव करत असताना, एक ८७ वर्षीय महिला त्याला भेटण्यासाठी थेट मैदानात पोहोचली.

Mumbai
M.S. Dhoni meets his 87 years old fan
फोटो सौजन्य - crickettimes

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे जगभरात चाहते आहेत. सर्वच वयोगटातील लोक मग ते पुरुष असो वा स्त्री, तरूण असो वा वृद्ध सगळेच धोनी आणि त्याच्या खेळाचे चाहते आहेत. बऱ्याच काळानंतर टीम इंडियात स्थान मिळवलेला धोनी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सिरीज खेळत आहे. जवळपास २ महिन्यांनंतर मैदानावर परतलेल्या कॅप्टन कूलने परत येताच शानदार अर्धशतक ठोकले आहे. त्यामुळे धोनीचे जगभरातील फॅन्स सुखावले आहेत. धोनीच्या अशाच एका ऑस्ट्रेलियन फॅनने नुकतीच त्याची भेट घेतली. ही अनोखी भेट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनी सिडनीच्या क्रिकेट मैदानात सराव करत असताना, एक ८७ वर्षीय महिला त्याला भेटण्यासाठी थेट मैदानात पोहोचली. हे पाहून चकित झालेल्या धोनीने त्या वृद्ध महिलेला खुर्चीमध्ये बसवले आणि स्वत:ही तिच्या बाजूला बसला. त्यानंतर या दोघांनी बराच वेळ गप्पाही मारल्या. याच प्रसंगादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धोनी फॅन्स आणि क्रिकेट प्रेमींकडून या फोटोंना भरभरुन प्रेम मिळत आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील एका खासगी वृत्तवाहिनीने या गोड क्षणांचा एक व्हिडिओसुद्धा युट्यूबवर शेअर केला आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान वृद्ध महिलेने धोनीची आणि त्याच्या खेळाची भरभरुन स्तुती केली. ‘मी अतिशय नशीबवान आहे कारण मी एमएस धोनीला भेटले, धोनीला भेटणं हा माझ्यासाठी खूप खास क्षण होता. मी ही भेट कधीच विसरु शकणार नाही…’, अशी प्रतिक्रिया या महिलेने व्यक्त केली आहे. याशिवाय धोनीच्या निमित्ताने मी आजच्या काळातील डॉन ब्रॅडमनला अशी प्रतिक्रिया देत त्या वृद्ध महिलेने धोनीला देखील भावूक करुन सोडले. वयाच्या ८७ व्या वर्षी या आजींबाईंना क्रिकेट खेळाविषयी आणि एका भारतीय खेळाडूविषयी असलेलं प्रेम नवलंच म्हणावे लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here