घरक्रीडाभारतीय संघात महेंद्रसिंग धोनीचे कमबॅक

भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीचे कमबॅक

Subscribe

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी संघात पुन्हा एकदा खेळणार आहे.

मेलबर्न येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी संघाची घोषणा केली आहे. या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी संघात पुन्हा एकदा खेळणार आहे. भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीचे कमबॅक झाले असून रिषभ पंतला डच्चू देण्यात आले आहे.

- Advertisement -

धोनी विंडीजविरुद्धच्या दौऱ्यात अखेरचा खेळला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यात धोनी अखेरचा खेळला होता. मात्र या खेळात त्याची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. धोनीला २०१८ मध्ये १३ डावांत २५ च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत. त्याच्या पदार्पणानंतरची त्याची ही सर्वा निच्चांक कामगिरी होती. तर मागील सात आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने अनुक्रमे २३, ७, २०, ३६, ८, ३३ आणि ० अशा धावा केल्या होत्या.

- Advertisement -

असा असणार आहे संघ

वन डे संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिकी, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, खलील अहमद, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा.

ट्वेंटी-२० संघ

विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या,खलील अहमद, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार.

वन डे चे वेळापत्रक

ऑस्ट्रेलिया – १२ जानेवारी (सिडनी), १५ जानेवारी (अॅडलेड) आणि १८ जानेवारी (मेलबर्न)
न्यूझीलंड – २३ जानेवारी, २६ जानेवारी, २८ जानेवारी, ३१ जानेवारी आणि ३ फ्रेबुवारी

टी-२० चे वेळापत्रक

न्यूझीलंड – टी-२० मालिका ६ फ्रेबुवारी, ८ फ्रेबुवारी आणि १० फ्रेबुवारी
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी संघात पुन्हा एकदा खेळणार आहे.


वाचा – जयपूरमध्ये आला ‘मेणाचा’ धोनी

वाचा – धोनी, कोहली नाहीत, दाखवा तुमची कमाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -