सुवर्णपदक विजेती राही सरनोबतचा दीड वर्षांपासून पगारच झाला नाही

भाजप सरकारने मोठा गाजावाजा करुन सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला सरकारी नोकरी दिली होती. परंतु, राहीला गेल्या दीड वर्षांपासून पगारच मिळालेला नाही.

Mumbai
maharashtra government not given salary to international player Rahi sarnobat
सुवर्णपदक विजेती राही सरनोबतचा दीड वर्षांपासून पगारच झाला नाही

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला गेल्या दीड वर्षांपासून पगारच मिळालेला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहीने २०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये भारताला नेमबाजीत सुवर्णपदक मिळवून दिले होते. नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवूण देणारी राही पहिली खेळाडू आहे. परंतु, सुवर्णपदक मिळवून देऊनही राहीला गेल्या दीड वर्षांपासून पगारच मिळालेला नाही. २०१४ मध्ये राहीला सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली होती. तेव्हापासून ती राज्य सरकारच्या महसूल विभागात कार्यरत आहे. परंतु, सप्टेंबर २०१७ पासून राहीला पगारच मिळालेला नाही. राहीने स्वत: याबाबतची माहिती ‘टाईम्स’ वृत्तसमूहाला दिली आहे.

राहीसोबत ‘या’ खेळाडूंनाही पगार मिळाला नाही

राहीसोबतच नेमबाज राहीसोबत नेमबाज पूजा घाटकर आणि कबड्डीपटू दीपिका जोसेफ यांनाही सरकारने मोठा गाजावाजा करत सरकारी नोकरी दिली होती. कबड्डीपटू दीपिका जोसेफ विक्री खात्यात साहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहे. तर नेमबाज पूजा घाटकरही विक्रिकर खात्यात आहे. दीपिकाला २०१४-१५ दरम्यान दुखापत झाली होती. यावेळी तिला पगार मिळाला नव्हता. तर पूजानेही पगाराबाबत आक्षेप उचलला आहे. बिनपगारी सुट्टी घ्यावी लागते, असे पूजाने सांगितले आहे.

राहीचा पगार का थांबवला?

राही सरनोबत विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत असते. त्याशिवाय, तिचा सरावही चालू असतो. त्यामुळे तिला कधीकधी कार्यालयात जाता येत नाही. याच मुद्याला धरुन गेल्या दीड वर्षांपासून दीड वर्षांपासून राहीचा पगार थांबवण्यात आला आहे.

थकलेला पगार दोन महिन्यात येईल – चंद्रकांत पाटील

राही सरनोबतच्या पगारासंबंधित माहिती उघड होताच यासंबंधी तिची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे राहीने सांगितले. ‘राहीला तिचा थकलेला पगार दोन तीन महिन्यात मिळेल’, असे चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले असल्याचे राहीने सांगितले. यासोबतच ‘सरकारी नोकरीवर खेळाडूंनी कधीपासून रुजू व्हावे, याचे स्वातंत्र्य खेळाडूंना देण्यात यावे’, अशी मागणी राहीने सरकारला केली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी राहीची बिनपगारी सुट्टी

२०२० मध्ये राही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तिला बिनपगारी सुट्टी घ्यावी लागली आहे. याबाबत राहीने सांगितले की, ‘बिनपगारी सुट्टी बाबत मला संबंधितांशी चर्चा करायची होती. परंतु, पूर्णवेळ खेळाडू असल्यामुळे मला तितका वेळ मिळू शकलेला नाही.’