महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

Mumbai

भारतात करोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्यांना विविध स्तरातून आर्थिक मदत मिळत आहे. यात क्रीडापटू आणि क्रीडा संघटनाही मागे नाहीत. आता करोनाविरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली आहे.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सरचिटणीस ड. गोविंद शर्मा, खजिनदार ड. अरुण देशमुख यांच्या संमतीने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनकडून ही देणगी देण्यात आली. शनिवारी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस ड. गोविंद शर्मा यांनी उद्योगमंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.