अंधाचेही दे दणादण; महाराष्ट्राचा अंध क्रिकेट संघ जाहीर

Pune
Maharashtra blind cricketers
निवड झालेला महाराष्ट्र संघ

क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) ने प्रशिक्षणासह अंधांच्या महाराष्ट्र क्रिकेट टीमच्या निवडीचे शिबीर पुणे येथे आयोजित केले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून ४० पूर्णपणे आणि काही अंशतः अंध खेळाडू सहभाग घेतला. तीन दिवस चाललेल्या या शिबिरातून महाराष्ट्र संघाची निवड डब्ल्यूबीसीसी (वर्ल्ड अंध क्रिकेट परिषद) आणि सीएबीआय (क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया) याच्या नियमांतर्गत केली आहे.

पुणे येथे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात हे शिबिर संपन्न झाले होते. या शिबिरात सहभागी झालेले सर्व खेळाडूंना त्यांच्या विभाग पातळीवरील सामने आणि राज्य पातळीवरील सामन्यांमध्ये त्यांच्या कामगिरीच्या आधार वर निवडण्यात आले होते. ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबईत झालेल्या राज्यपातळीवरील सामन्यांमध्ये भाग घेतलेल्या १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता यातून ४० उत्तम खेळाडू या शिबिरात निवडण्यात आले होते. महाराष्ट्र संघाची निवड डब्ल्यूबीसीसी (वर्ल्ड अंध क्रिकेट परिषद) आणि सीएबीआय (क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया) याच्या नियमांतर्गत झाली आहे.

Maharashtra blind cricket team
पुणे येथील शिबिरात सराव करताना अंध खेळाडू

या शिबिराचा मूळ उद्देश खेळाडूंना त्यांच्या खेळासाठी योग्य दिशा आणि सूचना मिळणे तसेच एखाद्या खेळाडूकडून सांघिक लक्ष गाठण्यास आणि योग्य ध्येयपूर्तीकडे वाटचालीस सहकार्य करणे हा होता.

असा आहे संघ –

स्वप्नील वाघ (संघप्रमुख), सुनील राठोड (उप संघप्रमुख), अमोल खर्चे, अनिल बेलसरे, प्रवीण कारलुके, निलेश नानारे, उत्तम मरगज, राहुल महाले, अनिल येती, अभिजित शिरतोडे, अभिजित धोडे, विनोद महाले, उमेश जाधव, विकास खिल्लारे तर सुशील पाटील, संदीप जाधव, दिनेश धांडे हे राखीव खेळाडू असतील.

या प्रसंगी यशवंत भुजबळ – अध्यक्ष पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन, माजीरीताई घाडगे – समाजसेविका, रवी वाघ – अध्यक्ष क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र, रमाकांत साटम – सचिव, दादा कुटे – खजिनदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवीन संघाचे अभिनंदन केले आणि पुढील खेळासाठी शुभेच्या दिल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here