भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडेची पत्नी होणार ‘ही’ सुंदर अभिनेत्री

भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे लवकरच करणार आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात

Mumbai

भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे लवकरच आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात करणार आहे. कारण मनीष पांडे बोहोल्यावर चढणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतेय. त्याने आपल्या लग्नाची घोषणा केली असून एक सुंदर अभिनेत्री त्याची होणारी पत्नी होणार आहे.

वयवर्ष ३० असणारा मनीष पांडे एक दक्षिणात्य अभिनेत्रीशी लग्न बंधनात अडकणार आहे. मनीषच्या विवाहाची सगळीकडे चर्चा असून त्याच्या विवाहाची तारिख देखील ठरली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पहिलेच शतक पुर्ण करणारा मनीष पांडे येत्या २ डिसेंबरला मुंबईत दक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टी हिच्याशी विवाहबंध होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अश्रिता शेट्टी आणि मनीष पांडे यांच्यामध्ये रिलेशनशिप असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. कारण ते दोघे आता लग्न करणार असल्याचे समोर आले आहे.

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा एक नावाजलेला चेहरा म्हणून अश्रिता शेट्टीची ओळख आहे. २६ वर्षांची असणारी अश्रिता दक्षिणात्य मोठ्या Indrajith, Oru Kanniyum Moonu Kalavaanikalum और Udhayam NH4 या चित्रपटात झळकली होती.

मनीष पांडे याच्या लग्नाच्या वेळी भारतीय संघ वेस्ट इंडिजविरूद्धच्या 20-20 सामने मुंबईत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोघांच्या लग्नात त्याचे जवळचे मित्र आणि नातेवाईक तसेच भारतीय संघातील सर्व खेळाडू मंडळी देखील हजर राहण्याची शक्यता आहे.