घरक्रीडाआशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मनप्रीत सिंग कर्णधार

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मनप्रीत सिंग कर्णधार

Subscribe

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे.

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा हॉकी संघ जाहीर झाला आहे. या संघाचे कर्णधारपद मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे. याआधी पी. आर. श्रीजेश भारतीय संघाचा कर्णधार होता. तर चिंगलेनसाना सिंग याला उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

भारत प्रमुख दावेदार 

भारत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा गतविजेता आहे. २०१६ मध्ये मलेशियात झालेल्या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ३-२ असा पराभव केला होता. त्यामुळे यावर्षीही भारतालाच ही स्पर्धा जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात आहे. नोव्हेंबरमध्ये भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघ चांगला खेळ करेल याचा प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांना विश्वास आहे, “आम्ही जो १८ जणांचा संघ निवडला आहे त्यात युवा आणि अनुभवी असे दोन्ही खेळाडू आहेत. त्यामुळे या संघात चांगला समतोल आहे. एशियाडमध्ये आम्हाला चांगले प्रदर्शन करता आले नसले तरी या स्पर्धेत आम्ही चांगला खेळ करू याचा मला विश्वास आहे.” आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी १८ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये होणार आहे.

भारतीय संघ :-

गोलकिपर : पी. आर. श्रीजेश, क्रिशन बहादूर पाठक

बचावफळी : हरमनप्रीत सिंग, गुरिंदर सिंग, वरुण कुमार, कोठाजीत सिंग, सुरेंदर कुमार, जरमनप्रीत सिंग, हार्दिक सिंग 
मधळीफळी : मनप्रीत सिंग (कर्णधार), सुमीत, निलकांत शर्मा, ललित कुमार उपाध्याय, चिंगलेनसाना सिंग (उप-कर्णधार)
आघाडीची फळी : आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -