घरक्रीडाएआयबीए बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी मेरी कोम भारतीय संघात

एआयबीए बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी मेरी कोम भारतीय संघात

Subscribe

एआयबीए महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. १० खेळाडूंच्या या संघात ५ वेळा विश्वविजेत्या मेरी कोमचाही समावेश आहे.

एआयबीए महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. १० खेळाडूंच्या या संघात ५ वेळा विश्वविजेत्या मेरी कोमचाही समावेश आहे. ही स्पर्धा १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत नवी दिल्लीत होणार आहे.

१० खेळाडूंचा भारतीय संघ

भारतीय संघात मेरी कोम (४८ किलो वजनी गट), पिंकी जांगरा (५१ किलो), मनीषा (५४ किलो), सोनिया (५७ किलो), सरिता देवी (६० किलो), सिम्रनजीत कौर (६४ किलो), लोव्हलीना बोरगोहेन (६९ किलो), सवेती बुरा (७५ किलो), भाग्यबती कचारी (८१ किलो) आणि सीमा पुनिया (+८१ किलो) यांचा समावेश आहे. या स्पर्धेत मेरी कोमकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. तिने पोलंडमध्ये झालेल्या सिलेसियान बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले होते. लोव्हलीना, सरिता, भाग्यबती, सिम्रनजीत यांनी सिलेसियान आणि तुर्कीमध्ये झालेल्या अहमेत कॉमेर्ट स्पर्धेत चांगले प्रदर्शन केल्यामुळे त्यांची या संघात निवड झाली आहे. तर इतर खेळाडूंची पात्रता फेरी खेळून या संघात निवड झाली आहे.

१२ वर्षांनी भारतात स्पर्धा

२००६ नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या कामगिरीवर साऱ्यांची नजर असणार आहे. २००६ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळवले होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -