घरक्रीडाग्रिफिन जिमखाना, पद्मावती क्रीडा मंडळाचा विजय

ग्रिफिन जिमखाना, पद्मावती क्रीडा मंडळाचा विजय

Subscribe

महापौर चषक खो-खो स्पर्धा

ग्रिफिन जिमखाना, शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी, पद्मावती क्रीडा मंडळ या संघांना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने सुरू असलेल्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष-महिला निमंत्रित खो-खो स्पर्धेत आपआपले सामने जिंकले.

पुरुषांच्या ब गटातील सामन्यात ग्रिफिन जिमखान्याने मुंबई उपनगरच्या श्री सह्याद्री संघावर १५-१३ अशी मात केली. ग्रिफिनच्या चिराग आगलेकरने दोन मिनिटे दहा सेकंद आणि एक मिनिटे वीस सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला. त्याला संकेत कदम (२:००, १:०० मिनिटे संरक्षण आणि चार बळी), सुनीत धनावडे (३ बळी), आकाश तोरणे (१:०० मिनिट संरक्षण आणि दोन बळी) यांची उत्तम साथ लाभली.

- Advertisement -

पुरुषांच्या अ गटातील सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने शिवशक्ती क्रीडा मंडळाचा १५-६ असा असा एक डाव राखून ९ गुणांनी पराभव केला. शिर्सेकर्स महात्मा गांधीच्या या विजयात सूरज पाटील (३:०० मिनिटे संरक्षण आणि एक बळी), नितेश रुके (२:५० मिनिटे संरक्षण), प्रतीक देवरे (२:४० मिनिटे संरक्षण आणि दोन बळी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

महिलांच्या क गटात औरंगाबादच्या पद्मावती क्रीडा मंडळाने रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्स क्लबचा १०-८ असा एक मिनिट वीस सेकंद राखून दोन गुणांनी पराभव केला.पद्मावतीकडून माधुरी पवार (१:३०, २:५० मिनिटे संरक्षण आणि तीन बळी), पल्लवी चव्हाण (२:३० मिनिटे संरक्षण आणि एक बळी), ज्योती मुकाडे (२:३० मिनिटे संरक्षण आणि एक बळी) यांनी चांगला खेळ केला.

- Advertisement -

दत्तसेवा क्रीडा मंडळाचा पराभव
महिलांच्या ड गटात उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने प्राची जटनुर (४:१० मिनिटे संरक्षण), गौरी शिंदे (३:०० मिनिटे संरक्षण आणि तीन बळी), श्वेता राऊत (३:०० मिनिटे संरक्षण आणि दोन बळी) यांच्या खेळाच्या जोरावर मुंबई उपनगरच्या दत्तसेवा क्रीडा मंडळावर ११-५ असा विजय मिळवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -