घरक्रीडाअपूर्वी चंडेलाची सुवर्ण कमाई

अपूर्वी चंडेलाची सुवर्ण कमाई

Subscribe

मेयटन कप नेमबाजी स्पर्धा

भारताची आघाडीची नेमबाज अपूर्वी चंडेलाने ऑस्ट्रियामध्ये सुरु असलेल्या मेयटन कप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच युवा नेमबाज दिव्यांश सिंह पन्वरलाही सुवर्णपदक मिळवण्यात यश आले. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात दिव्यांशने २४९.७ गुणांसह सुवर्ण, तर भारताच्याच दीपक कुमारने कांस्यपदक पटकावले. दीपकने अंतिम फेरीत २२८ गुण मिळवले.

राष्ट्रकुल आणि विश्वचषक स्पर्धेतील पदकविजेत्या अपूर्वीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत २५१.४ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. याच गटात भारताच्या अंजुम मुद्गिलला (२२९ गुण) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

भारताच्या या चारही नेमबाजांनी याआधीच २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. अंजुम आणि अपूर्वीने २०१८ मध्ये झालेल्या नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे दुसरा आणि चौथा क्रमांक पटकावत ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. दिव्यांशने मागील वर्षी बीजिंगमध्ये झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात रौप्यपदक मिळवत ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला होता. टोकियो ऑलिम्पिकला २४ जुलैला सुरुवात होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -