घरक्रीडाएमसीएकडून १४.२१ कोटींची मुंबई पोलिसांची थकबाकी

एमसीएकडून १४.२१ कोटींची मुंबई पोलिसांची थकबाकी

Subscribe

मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए ही देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून सर्वश्रृत आहे. मात्र याच श्रीमंत संघटनने पोलिसांची १४.२१ कोटींची देणी थकवली आहेत. बऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठी एमसीएनं पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र, अजूनही त्यांचे पैसे एमसीएनं भागवलेले नाहीत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागील महिन्यात दाखल केलेल्या आरटीआयमधून ही माहिती मिळाली आहे.

आतापर्यंतचे थकीत पैसे
आरटीआयच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी गेल्या पाच वर्षांमध्ये एमसीएच्या प्रत्येक खासगी कार्यक्रमांसाठी बंदोबस्त ठेवला होता. या सर्व मॅचेससाठी लागणारे एकूण १४ कोटी २१ लाख इतकी थकबाकी सध्या एमसीए पोलिसांना देणं लागते.

- Advertisement -

आतापर्यंत भरलेले पैसे
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या मॅचेससाठी २००८ ते २०११ पर्यंत जो पोलीस बंदोबस्त एमसीएनं मागवला त्यासाठी त्यांनी एकूण ३१ कोटी ६७ लाख ९४ हजार ७३३ रुपयांचा भरणा केला आहे. तसेच २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या फुटबॉल लीग आणि मॅरेथॉनमध्ये घेण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी २ कोटी ६५ लाख इतकी रक्कम एमसीएनं भरली असल्याची माहिती समोर आली आहे.
अजूनही एमसीए पोलिसांची इतकी मोठी थकबाकी कधी परत करणार यावर मात्र प्रश्नचिन्हच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -