घरक्रीडाफुटबॉल मॅचमुळे मेक्सिकोत आला भूकंप!

फुटबॉल मॅचमुळे मेक्सिकोत आला भूकंप!

Subscribe

सध्या जगभरात क्रेझ आहे ती फिफा वर्ल्डकपची! पण याच फुटबॉलमुळे मेक्सिकोमध्ये भूकंप आला. मेक्सिकोने जर्मनीला हरवल्यानंतर मेक्सिकन फुटबॉल प्रेमींनी केलेल्या विजयोत्सवामुळे हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे.

सध्या फिफाची क्रेझ सगळीकडे बघायला मिळतेय. याच फुटबॉल मॅचमुळे मॅक्सिकोत मात्र भूकंप आला आहे. फुटबॉल मॅचमुळे भूकंप? हे कसं शक्य आहे? असंच आपल्याला वाटलं असेल. पण मेक्सिकोत असं झालं आहे. पण हा भूकंप नैसर्गिक नव्हता तर मानवनिर्मित होता!

का आला मेक्सिकोत भूकंप ?

रविवारी मेक्सिको विरुद्ध बलाढ्य जर्मनी असा सामना रंगला. ३५ व्या मिनिटाला हरविंग लोझानोने गोल केला. गतविजेत्या जर्मनीला मेक्सिको हरवू शकेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण मेक्सिकोने जर्मनीविरुद्धचा हा सामना १-० असा जिंकला. अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात मेक्सिकोने विजय मिळवला आणि या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मेक्सिकोवासियांनी इतका जल्लोषात केला की, या ठिकाणी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यावेळी आवाज, टाळ्या, उड्या यांचा इतका प्रचंज आवाज होता की काही काळासाठी हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला

- Advertisement -

उड्यांमुळेच भूकंप

मेक्सिकोने सामना जिंकल्यानंतर फुटबॉलप्रेमींनी उड्या मारल्या आणि या उड्यांमुळेच भूकंपाचा धक्का बसला, असे भौगोलिक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात त्यांनी ट्वीट देखील केले आहे. सकाळी साधारण ११.३२ च्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. हा भूकंप फुटबॉल मॅचदरम्यानच्या आनंदोत्सवाने झाला हे मात्र नक्की!

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -