मुंबई इंडियन्सनं पाडला रॉयल चॅलेंजर्सचा फडशा!

Mumbai
malinga bold rcb batsmans
लसिथ मलिंगा

बऱ्याच प्रतिक्षेनंतर ६व्या मॅचमध्ये विजय मिळालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सनं वानखेडेवर आपणच रॉयल असल्याचं सिद्ध करत मोठा विजय संपादन केला आहे. रॉयल चॅलेंजर्सनं दिलेलं १७२ धावांचं आव्हान मुंबईच्या संघानं अगदी लीलया पार पाडलं. यात कॅप्टर रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक या दोघांनी संघाला दिलेल्या दणकेबाज सलामीचा सिंहाचा वाटा राहिला.

पॉइंट टेबलमध्ये सर्वात तळाला असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी मुंबई इंडियन्स विरुद्धचा आजचा सामना महत्त्वाचा होता. आयपीएल टी-२० २०१९ मध्ये आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी कॅप्टन विराट कोहलीच्या टीमला हा सामना जिंकणं आवश्यक होतं. त्याच इराद्याने मैदानात उतरलेल्या कॅप्टन कोहलीला टॉस हरल्यामुळे पहिला झटका बसला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने आधी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मुंबई इंडियन्सला होईल असा अंदाज वर्तवला जात होता. रॉयल चॅलेंजर्सच्या डावाची सुरुवात देखील तशीच झाली.

कॅप्टन कोहली स्वस्तात परतला…

तिसऱ्याच ओव्हरमध्ये बेहरनडॉर्फनं विराट कोहलीला अवघ्या ८ रनांवर आऊट करत बँगलोरच्या टीमला मोठा झटका दिला. सुरुवातीपासून संथ खेळणाऱ्या पार्थिव पटेललाही सातव्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्यानं सूर्यकुमार यादवकडे झेल द्यायला भाग पाडलं. रॉयल चॅलेंजर्सचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि मोईन अली यांनी डावाला आकार द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला पीचचा अंदाज घेत खेळणाऱ्या या दोघांनी नंतर मात्र मुंबई इंडियन्सच्या बॉलिंगचा यथेच्छ समाचार घेतला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी तब्बल ९५ रनांची पार्टनरशीप केली. यामध्ये दोघांच्या अर्धशतकांचा समावेश होता. १८व्या ओव्हरमध्ये मोईन अली ५० रनांवर आऊट झाला तेव्हा स्कोअर होता १४४ रनांवर ३ विकेट. आणि उरलेल्या ३ ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्सने ४ विकेट गमावल्या! आणि यातल्या तीन विकेट एकट्या मलिंगानं घेतल्या!

मलिंगाच्या एकाच ओव्हरमध्ये ३ विकेट!

मोईन अलीनंतर मलिंगाच्या त्याच ओव्हरमध्ये स्टॉयनिस भोपळा न फोडताच माघारी परतला. १८वी ओव्हर खेळून काढल्यानंतर १९व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर एबी डिव्हिलियर्स ७५ रनांवर कन्फ्युजनमध्ये रनआऊट झाला. त्याच्याच पुढच्या बॉलवर अक्षदीप नाथनं पॅव्हेलियनचा रस्ता धरला. आणि त्याच ओव्हरमध्ये पाचव्या बॉलवर पवन नेगीनंही भोपळा न फोडताच आपली विकेट मलिंगाला बहाल केली! डिव्हिलियर्स आणि मोईन अली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं मुंबई इंडियन्सपुढे १७२ धावांचं आव्हान ठेवलं.

इनिंगच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक या सलामीच्या जोडीनं आक्रमक बॅटिंग करायला सुरुवात केली. त्यातही डिकॉकनं अनेकदा थोडक्यात वाचून सुद्धा बँगलोरच्या बॉलिंगवर अटॅक करणं सुरूच ठेवलं. पहिल्या ६ ओव्हरच्या पॉवरप्लेमध्ये या दोघांनी तब्बल ६७ धावा वसूल केल्या. मात्र ८व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मोईन अलीनं रोहित शर्माला क्लीन बोल्ड करत माघारी पाठवलं. मात्र, तोपर्यंत टीमच्या ७० धावा झाल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here