घरIPL 2020MI vs CSK: धोनीच्या चेन्नईकडे शेवटची संधी

MI vs CSK: धोनीच्या चेन्नईकडे शेवटची संधी

Subscribe

आयपीएलच्या १३ व्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज शुक्रवारी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. या मोसमात चेन्नईच्या संघाने सुमार कामगिरी केली आहे. दरम्यान, आज मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नई त्यांच्या युवा खेळाडूंना संधी देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. शारजामध्ये होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

या सामन्यात दोन गुणांसह रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्जकडे प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी जर-तर अशी संधी आहे.

- Advertisement -

MI vs CSK आकडे काय म्हणतात?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात २९ सामने (२००८-२०२०) झाले आहेत. मुंबई इंडियन्सने १७ तर चेन्नईने १२ सामने जिंकले आहेत. मुंबई आणि चेन्नई संघ प्ले-ऑफमध्ये आमने-सामने पाहायला मिळाले आहेत. मात्र, यंदा चेन्नईचा संघ गुणतालिकेत तळाला आहे.

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर कबूल केलं की संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. परंतु संघ उर्वरित चार सामने जिंकला तरीही तो १४ गुण मिळवू शकतो. ज्यामुळे त्यांना जर-तर अशा पद्धतीत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळू शकते. मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाला की, वयोवृद्ध खेळाडूंनी परिपूर्ण अशा टीमने गेल्या दोन सत्रात चांगली कामगिरी केली. मात्र, आता तो बलाढ्य संघ दिसत नाही आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर चेन्नईने विजय मिळविल्यानंतर पुढील प्रवास मात्र खडतर झाला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -