MI vs KKR Live Update : मुंबईचा विजय 

आज आयपीएलमध्ये मुंबई आणि कोलकाता या संघांमध्ये सामना होत आहे. 

de kock and hardik pandya

डी कॉकने ४४ चेंडूत नाबाद ७८ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने १४९ धावांचे लक्ष्य १७ व्या षटकात गाठत सामना जिंकला.


पॉवर-प्लेच्या ६ षटकांनंतर मुंबईची बिनबाद ५१ अशी धावसंख्या होती. रोहित १९, तर डी कॉक २७ धावांवर खेळत होता.


क्विंटन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मा या सलामीवीरांनी मुंबईच्या डावाची दमदार सुरुवात केली.


मुंबईकडून राहुल चहरने २, तर बोल्ट, बुमराह आणि कुल्टर-नाईल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


कमिन्स (३६ चेंडूत नाबाद ५३) आणि मॉर्गन (२९ चेंडूत नाबाद ३९) यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे कोलकाताने २० षटकांत ५ बाद १४८ अशी धावसंख्या उभारली.


कमिन्सने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे टी-२० क्रिकेटमधील पहिलेच अर्धशतक ठरले.


कर्णधार मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांनी कोलकाताचा डाव सावरला.


कोलकाताला पाचवा झटका. आंद्रे रसेलला (१२) बुमराहने केले बाद.


१० षटकांनंतर कोलकाताची ४ बाद ५७ अशी धावसंख्या.


लेगस्पिनर राहुल चहरने शुभमन गिल (२१) आणि दिनेश कार्तिक (४) यांना सलग दोन चेंडूंवर माघारी पाठवले.


कोलकाताला दुसरा झटका. नितीश राणा ५ धावांवर बाद.


कोलकाताची अडखळती सुरुवात. ट्रेंट बोल्टने राहुल त्रिपाठीला (७) पाठवले माघारी.


मुंबईच्या संघात एक बदल. जेम्स पॅटिन्सनच्या जागी नेथन कुल्टर-नाईलची निवड.


मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


आजच्या सामन्यापासून इयॉन मॉर्गन कोलकाताचे नेतृत्व करणार आहे.


आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये सामना होत आहे.