घरक्रीडाMI vs KKR Live Update : मुंबईने कोलकाताला पराभूत करत विजयाचं खातं...

MI vs KKR Live Update : मुंबईने कोलकाताला पराभूत करत विजयाचं खातं उघडलं

Subscribe

आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध कोलकाता असा सामना होत आहे. 

IPL च्या तेराव्या मोसमात मुंबईने कोलकाता पराभूत करत विजयाचं खातं उघडलं. सविस्तर वाचा


कोलकाताचे ७ खेळाडू तंबुत परतले असून पराभवाच्या छायेत हा संघ आहे. सामन्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. १७ षटकांनंतर केकेआरची धावसंख्या: ११२/७, पॅट कमिंस (७) आणि शिवम मावी (४)

- Advertisement -

कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक तंबुत परतला असून कोलकाताला तीसरा धक्का बसला आहे. ११ षटकांनंतर केकेआरची धावसंख्या: ७२/३, इऑन मॉर्गन (१) आणि नितीश राणा (२४)


सुनील नरेन ९ धावांवर बाद झाला. जेम्स पॅटिनसनने गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकने झेल टिपला. पाच षटकानंतर केकेआरची धावसंख्या: ४१/२, दिनेश कार्तिक (१६) आणि नितीश राणा (९)

- Advertisement -

कोलकाताला शुभमन गीलच्या स्वरुपात पहिला धक्का बसला आहे. शुभमन गील ७ धावा करुन तंबुत परतला आहे. कोलकाताची धावसंख्या तीन षटका अखेरीस १८ अशी आहे.


मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा झुंजार खेळीच्या मदतीने मुंबईला कोलकातासमोर १९६ धावांचं आव्हान ठेवता आलं. मुंबईने ५ गड्यांच्या मोबदल्यात १९५ धावा केल्या. रोहित शर्माने या हंगामातील पहिलं अर्धशतक ठोकलं.

mumbai indians scorecard


मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने यंदाच्या मोसमातील आपले अर्धशतक झळकावले. त्याने हे अर्धशतक ३९ चेंडूत पूर्ण केले.


मुंबईच्या १२ व्या षटकात १०० धावा पूर्ण.


सूर्यकुमार यादव चांगल्या फलंदाजीनंतर ४७ धावांवर धावचीत झाला. त्याने या धावा २८ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केल्या.


मुंबईच्या ५० धावा सहाव्या षटकात पूर्ण.


डी कॉक बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरला.


मुंबईला दुसऱ्याच षटकात पहिला झटका बसला. शिवम मावीने क्विंटन डी कॉकला एका धावेवर बाद केले.


मुंबईच्या संघात एकही बदल नाही. कुल्टर-नाईल अजूनही संघाबाहेरच.


कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय.


मुंबईचा हा यंदाच्या मोसमातील दुसरा, तर कोलकाताचा पहिला सामना.


आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -