MI vs KKR: डीकॉकचा झंझावात; मुंबईचा कोलकातावर ८ गडी राखून विजय

सौजन्य - आयपीएल ट्विटर

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने KKR चा ८ गडी राखून पराभव करत विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. सलामीवीर क्विंटन डिकॉच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने कोलकाताच १४९ धावांचं आव्हान सहज पार केलं. या विजयासह मुंबई इंडियन्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार मॉर्गनच्या निर्णयावर कोलकाताच्या फलंदाजांनी पाणी फेरलं. सलामीवीर राहुल त्रिपाठी आणि शुभमन गिलने दवाची सुरुवात केली. या सामन्यात फॉर्ममध्ये असलेला त्रिपाठीकडून कोलकाताला भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, त्रिपाठीने निराश केलं. कोलकाताचया डावाची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. KKR ला त्रिपाठीच्या रुपात पहिला धक्का १८ धावांवर बसला. सुर्यकुमार यादवने पॉईंटला अप्रतिम झेल घेतला. त्रिपाठीने केवळ ७ धावा केल्या. यानंतर मैदानावर आलेल्या नितीश राणा देखील स्वस्तात बाद झाला. राणा बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजी करायला आला. कर्णधार पदावरून मुक्त झाल्या नंतर कार्तिक चांगला खेळेल असं सर्वांना अपेक्षित होतं. मात्र, कार्तिकने पुन्हा एकदा निराश केलं. कार्तिकने केवळ ४ धावा केल्या. एकीकडे गडी बाद होत असताना सलामीवीर गिलने संघाचा डाव एका बाजूने लावून धरला होता. मात्र धावांचा वेग वाढवण्यासाठी फटकेबाजी करायला सुरुवात केली. चहरच्या गोलंदाजींवर षटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २१ धावा केल्या.मोठ्या फटक्यांसाठी ओळखला आंद्रे रसल आजही अयशस्वी ठरला. बुमराहने टाकलेल्या उसळत्या चेंडूवर त्याने किपरकडे झेल दिला. त्याने अवघ्या १२ धावा केल्या. निम्मा संघ लवकर तंबूत परतल्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन- अष्टपैलू पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकून संघाला १४८पर्यंत मजल मारून दिली. पॅट कमिन्सने पहिले अर्धशतक ठोकले. त्याने ३६ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने त्याला उत्तम साथ दिली. त्याने २९ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या. कमिन्स आणि मॉर्गनच्या फटकेबाजीच्या जोरावर<span;> कोलकाताने २० षटकात ५ बाद १४८ धावा करत मुंबईला १४९ धावांचा उद्दिष्ट दिलं. मुंबईकडून राहुल चहरने २ तर बोल्ट, बुमराह आणि कुल्टर-नाईलने १-१ गडी घेतले.