घरIPL 2020MI vs KXIP Live Update : मुंबईचा पंजाबवर दणदणीत विजय

MI vs KXIP Live Update : मुंबईचा पंजाबवर दणदणीत विजय

Subscribe

आज आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध पंजाब असा सामना होत आहे. 

मुंबई इंडियन्सने पंजाबला ४८ धावांनी पराभूत करत या मोसमातील दुसरा विजय मिळवला आहे. सविस्तर वाचा


सरफराज खान ७ धावांवर स्वस्तात बाद झाला. पंजाबला १२ चेंडूत ६९ धावांची आवश्यकता.

- Advertisement -

मॅक्सवेल ११ धावांवर बाद झाला असून पंजाब पराभवाच्या छायेत आहे.


फॉर्मात असलेला लोकेश राहुलचा १७ धावांवर लेगस्पिनर राहुल चहरने त्रिफळा उडवला.

- Advertisement -

बुमराहने मयांकला (२५) बाद करत पंजाबला पहिला झटका दिला.


१९२ धावांचा पाठलाग करताना मयांक अगरवाल आणि कर्णधार लोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात केली.


किरॉन पोलार्ड (२० चेंडूत नाबाद ४७) आणि हार्दिक पांड्या (११ चेंडूत नाबाद ३०) यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने २० षटकांत ४ बाद १९१ अशी धावसंख्या उभारली.


रोहित शर्मा ७० धावांवर बाद झाला.


रोहितने ४० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.


किशनला (३२ चेंडूत २८) कृष्णप्पा गौथमने बाद केले.


रोहित शर्मा आणि ईशान किशनने मुंबईला सावरले. या दोघांनी ६२ धावांची भागीदारी रचली.


सूर्यकुमार यादव १० धावांवर धावचीत झाला.


मुंबईच्या डावाची निराशाजनक सुरुवात झाली. शेल्डन कॉट्रेलने पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉक खातेही न उघडता माघारी पाठवले.


पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.


दोन्ही संघांचा हा यंदाच्या मोसमातील चौथा सामना असून दोन्ही संघांनी एक सामना जिंकला, तर दोन सामने गमावले आहेत.


आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब असा सामना होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -