घरक्रीडामीराबाई चानूचा राष्ट्रीय विक्रम; पण पदकाची हुलकावणी

मीराबाई चानूचा राष्ट्रीय विक्रम; पण पदकाची हुलकावणी

Subscribe

माजी विश्व विजेत्या मीराबाई चानूने जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. मात्र, महिलांच्या ४९ किलो वजनी गटात तिला पदक मिळवण्यात अपयश आले. २५ वर्षीय मीराबाईने ३ पैकी ३ प्रकारांमध्ये नवा विक्रम केला. तिने स्नॅचमध्ये ८७ किलो वजन उचलले, तर क्लीन आणि जर्कमध्ये तिने ११४ किलो वजन उचलले. त्यामुळे तिने एकूण २०१ किलो वजन उचलले. याआधी तिने राष्ट्रीय विक्रम करताना १९९ किलो (८८ किलो+१११ किलो) वजन उचलले होते. ही कामगिरी तिने यावर्षी एप्रिलमध्ये चीन येथे झालेल्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत केला होते.

विक्रमी कामगिरी करूनही मीराबाईला पदकाने हुलकावणी दिली. या स्पर्धेत चीनच्या जियांग हुईहुआने २१२ किलोचा (९४ किलो+११८ किलो) जागतिक विक्रम करत सुवर्णपदकाची कमाई केली. याआधी जागतिक विक्रम चीनच्याच होऊ झीहुईच्या (२१० किलो) नावे होता. झीहुईने या स्पर्धेत २११ किलो (९४ किलो+११७ किलो) वजन उचलत रौप्यपदक मिळवले. कांस्यपदक २०४ किलो वजन उचलणार्‍या उत्तर कोरियाच्या री साँग गमला मिळाले.

- Advertisement -

मीराबाईने स्नॅचमध्ये ८७ किलो वजनाची नोंद केल्यानंतर क्लीन आणि जर्कमध्ये आधी १०० किलो आणि मग ११४ किलो वजन उचलले. यानंतर तिने ११८ किलोचे वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तिला अपयश आले. त्यामुळे कांस्यपदक तिच्या हातून निसटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -