घरक्रीडाटी-ट्वेटीत मिताली राज एक नंबर!

टी-ट्वेटीत मिताली राज एक नंबर!

Subscribe

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू मिताली राजने टी-ट्वेटीत २२८३ धावा केल्या आहेत. टी-ट्वेटी सामन्यात इतके धावा करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू मिताली राज हीने टी-ट्वेटीमध्ये नवा विक्रम केला आहे. या विक्रमात तीने भारताच्या पुरुष क्रिक्रेट संघालाही मागे टाकले आहे. मितालीने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेटी क्रिकेट सामन्यात एकूण २२८३ धावा केल्या आहेत. तिने टी-ट्वेटी सामन्यात एवढ्या धावा करुन भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही मागे टाकले आहे. त्यामुळे भारतात मिताली राज ही पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेट संघामधून टी-ट्वेटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.

हेही वाचा – भारताच्या महिला क्रिकेटर्सचा T-20 वर्ल्डकपआधी जोरदार भांगडा

- Advertisement -

भारतात मिताली ठरली पहिली

भारतात महिला आणि पुरुष क्रिकेट संघाच्या टी-ट्वेटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्यात मिताली पहिली ठरली आहे. मिताली नंतर रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहित शर्माने २२०७ धावा केल्या आहेत. तर तिसरा क्रमांक पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा लागतो. त्याने २१०२ धावा केल्या आहेत. त्यानंतर चौथा क्रमांक महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा नंबर लागतो. तिने १८२७ धावा केल्या आहेत. या खालोखाल पाचवा क्रमांक सुरेश रैना आणि सहावा क्रमांक महेंद्रसिंग धानी याचा लागतो.

हेही वाचा – राज्यवर्धन: माजखोर क्रीडा संघटकांना धडा शिकवा, तरच भारताची कामगिरी उंचावेल!

- Advertisement -

जगात ठरली चौथ्या क्रमांकाची खेळाडू

जगात आंतरराष्ट्रीय महिला टी-ट्वेटी क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादित मितालीचा चौथा क्रमांक लागला आहे. या यादित न्यूझीलंडची सूजी बेट्स ही पहिल्या क्रमांकावर आहे. तिने तब्बल २९९६ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर ही असून तिने २६९१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर इंग्लंडची एडवर्ड हीचा तिसरा क्रमांक लागत असून तिने २६०५ धावा केल्या आहेत.


हेही वाचा – भारतीय संघाच्या निवड समिती सदस्यांचे मानधन कोटीत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -