घरक्रीडाइंग्लंडचा 'हा' क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह 

इंग्लंडचा ‘हा’ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह 

Subscribe

इंग्लंडचा संघ रविवारी श्रीलंकेत दाखल झाला.

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात लवकरच दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ रविवारी श्रीलंकेत दाखल झाला. त्यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंची कोरोना चाचणी झाली. लॅटरल फ्लो चाचणीत सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आधी जाहीर केले. मात्र, खेळाडूंची विमानतळावर पीसीआर चाचणीही झाली होती. या चाचणीचा अहवाल येण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे ईसीबीने याबाबत काहीही जाहीर केले नव्हते. मात्र, या चाचणीमध्ये अष्टपैलू मोईन अलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मोईनला कोरोनाची लागण झाली असली त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे ईसीबीने स्पष्ट केले आहे. श्रीलंकन सरकारच्या क्वारंटाईनच्या नियमांनुसार, मोईनला आता १० दिवस सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या हंबनटोटा येथे असून १० जानेवारीला गॉलसाठी रवाना होणार आहे. मोईनला मात्र गॉल येथे एका खासगी हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याला मंगळवारी या हॉटेलमध्ये पाठवले जाईल.

- Advertisement -

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १४ जानेवारीपासून गॉल येथे खेळला जाणार आहे. मोईनला १३ जानेवारीपर्यंत सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहावे लागणार असल्याने तो पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. मोईनने आतापर्यंत ६० कसोटी सामने खेळले असून त्यात २७८२ धावा करताना १८१ विकेटही घेतल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -