घरक्रीडाधोनीला बिर्याणी न दिल्यामुळे ‘या’ खेळाडूने गमावले भारतीय संघातील स्थान!

धोनीला बिर्याणी न दिल्यामुळे ‘या’ खेळाडूने गमावले भारतीय संघातील स्थान!

Subscribe

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या मोहम्मद कैफने एका मुलाखतीत महेंद्रसिंग धोनीच्या बिर्याणी प्रेमाविषयी सांगितले आहे. याच बिर्याणीमुळे भारतीय संघात आपण स्थान गमावले असल्याचा धक्कादायक खुलासा देखील मोहम्मद कैफेने केला आहे.

याबाबत कैफने त्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी २००६ साली रणजी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक केले. माझ्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशच्या संघाला विजेतेपद मिळाले. त्यावेळी मी प्रशिक्षक ग्रेग चॅप यांच्यासमवेत संपूर्ण संघाला जेवणासाठी घरी निमंत्रण दिले होते. त्या मेजवानीमध्ये बिर्याणी होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांसारखे दिग्गज खेळाडू घरी आले होते. यावेळी पाहुणाचारात काहीही कमी पडू नये म्हणून मी त्यांच्यासोबत बसलो होतो.’

- Advertisement -

‘त्याच वेळेस दुसऱ्या रूममध्ये धोनी, सुरेश रैना आणि इरफान पठाण सारखे नवे खेळाडू बसले होते. दिग्गज खेळाडूंच्या पाहुणचारामुळे मी या नव्या खेळाडूंची जास्त विचारपूस केली नाही. तसेच मेजवानी दरम्यान धोनीला मी बिर्याणी न वाढल्याने धोनी नाराज झाला होता. नेमका धोनी २००७मध्ये भारतीय संघाचा कर्णधार झाला आणि त्यावेळेस जेव्हा तो मला भेटायचा तेव्हा तो मला मजेत म्हणायचा की, मी घरी आलो तेव्हा तू मला बिर्याणी वाढली नाही. बहुतेक त्याच बिर्याणीने माझ्या कारकिर्दीचा बळी घेतला’, असे मजेशीर पद्धतीने कैफ म्हणाला. तसेच धोनीबरोबरच्या आठवणींना त्याने मुलाखतीत उजाळा दिला.


हेही वाचा – Coronavirus: मेरठ मधील खासगी लॅबचा ढिसाळ कारभार आला उघडकीस!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -