घरक्रीडाइन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या 'त्या' फोटोमुळे शमीची पत्नी ट्रोल

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे शमीची पत्नी ट्रोल

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. पुन्हा एकदा शमीची पत्नी हसीन जहाँवर सोशल मीडियावरील लोकांनी निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी हसीनने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होतो. या पोस्टवरून सध्या हसीनला ट्रोल केले जात आहे.

हसीनने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी तुमची सुरुवात लढाई आहे. स्वप्ने पाहण्याची हिम्मत करा, प्रयत्न करण्याची हिम्मत करा, हारण्याची हिम्मत करा आणि यशस्वी होण्याची हिम्मत करा.’ हसीन सोशल मीडियावर खूप चांगलं बोलली आहे. पण काही लोकांना तिच्या बोलण्याचा अंदाज आवडला नाही आहे.

- Advertisement -

हसीनच्या या पोस्टवर एका युजरने लिहिले आहे की, ‘अशाप्रकारे किती पोस्ट तू टाकली तरी, शमी भाई तुझ्या जाळ्यात फसणार नाही.’ अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी हसीनच्या पोस्टवर दिल्या आहे.

- Advertisement -

हसीन नेहमी डान्स किंवा पार्टीचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. तर कधी शायरी पोस्ट करत असते.

६ जून २०१४ रोजी मोहम्मद शम्मीने कलकत्ता मॉडेल हसीन जहाँसोबत लग्न केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये मोहम्मद शमीवर हसीनने मारण्याचा, बलात्कार, हत्येचा प्रयत्न करण्याचा आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी हसनीने शमी आणि त्याच्या भावा विरोधात गुन्हा दाखल केला होता. शमी विरोधात भादंवि कलम ४९८ ए, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्याचा भाऊ हसीद अहमदवर कमल ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


हेही वाचा – २०२० वर्ष आयपीएलविना संपावे असे वाटत नाही – गांगुली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -