Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल मोहम्मद सिराजचे कौतुक - लायन

IND vs AUS : वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल मोहम्मद सिराजचे कौतुक – लायन

वर्णभेद किंवा शिवीगाळ याला खेळात जराही स्थान नाही.

Related Story

- Advertisement -

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर काही चाहत्यांनी वर्णभेदी टीका झाली होती. भारतीय संघाने याबाबत सामनाधिकारी डेविड बून यांच्याकडे तक्रार केली. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा या चाहत्यांनी सिराजवर वर्णभेदी टीका केली आणि हे सिराजने त्वरित पंचांना सांगितले. त्यानंतर या चाहत्यांना मैदानातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवण्याबद्दल सिराजचे कौतुक झाले पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नेथन लायनने व्यक्त केले.

सिराजसोबत जे झाले, ते निंदनीय होते. त्याने वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवला याबद्दल त्याचे कौतुक झाले पाहिजे. त्याने इतर खेळाडूंसमोर उदाहरण ठेवले आहे. वर्णभेद किंवा शिवीगाळ याला खेळात जराही स्थान नाही. काही चाहते खेळाडूंना चिडवतात. त्यांना आपण गंमत करत आहोत असे वाटते. मात्र, याचा खेळाडूंवर काय परिणाम होतो याचा हे चाहते विचार करत नाहीत, असे लायन म्हणाला.

- Advertisement -

क्रिकेट हा खेळ सर्वांसाठी आहे आणि या खेळात वर्णभेदाला स्थान नाही. चाहते तुमच्यावर वर्णभेदी टीका करत असतील आणि याबाबतची माहिती तुम्ही सामनाधिकाऱ्यांना दिली पाहिजे. आता सुरक्षारक्षकही मैदानात उपस्थित असतात. त्यांना सांगून वर्णभेदी टिपण्णी करणाऱ्यांना मैदानातून बाहेर काढता येते, असे लायनने नमूद केले. तसेच दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये मलाही अशाच काही गोष्टींचा सामना करावा लागल्याचेही यावेळी लायनने सांगितले.

- Advertisement -