मूडी, राजपूत प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

Mumbai
मूडी, राजपूत

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची निवड येत्या शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकपदासाठी निवडक ६ उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात घेणार आहे. या ६ उमेदवारांमध्ये सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि श्रीलंकेचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी, न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमन्स, भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि भारताचा माजी खेळाडू रॉबिन सिंग यांचा समावेश आहे.

सोमवारी बीसीसीआयने या ६ उमेदवारांना मुलाखतीची वेळ आणि तारीख याबाबत सांगितले. बीसीसीआयकडे मुख्य प्रशिक्षक, तसेच सहाय्यक प्रशिक्षकपदासाठी (फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) २००० हून अधिक अर्ज आले होते. मुख्य प्रशिक्षकाची नेमणूक क्रिकेट सल्लागार समिती करणार असून सहाय्यक प्रशिक्षकांची निवड बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद करतील.

शास्त्रींची मुलाखत स्काईपवरून
सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कर्णधार विराट कोहलीने पाठिंबा दर्शवल्याने तेच प्रशिक्षकपदी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शास्त्री आणि इतर सहाय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिज दौर्‍यानंतर संपुष्टात येणार आहे. ते वेस्ट इंडिजला असल्यामुळे शुक्रवारी त्यांची मुलाखत स्काईपवरून घेण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here