घरIPL 2020IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीने मोडला रैनाचा 'हा' अनोखा विक्रम

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीने मोडला रैनाचा ‘हा’ अनोखा विक्रम

Subscribe

रैनाने ट्विटरवरून धोनीचे अभिनंदन केले. 

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तसेच तो या स्पर्धेतीलच नाही, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक मानला जातो. त्याने क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम केले आहे. आता आणखी एक विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे. धोनी आता आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. आज (शुक्रवारी) होत असलेला सनरायजर्स हैदराबादविरुद्धचा सामना हा धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील १९४ वा सामना आहे. त्यामुळे त्याने त्याचा सहकारी सुरेश रैनाला (१९३) मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

रैनाने केले अभिनंदन

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक सामन्यांचा विक्रम आपल्या नावे करणाऱ्या धोनीचे रैनाने ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले. ‘आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरल्याबद्दल माही भाई तुझे अभिनंदन. माझा विक्रम तू मोडलास याचा मला खूप आनंद आहे. आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा आणि चेन्नई सुपर किंग्स संघ यंदा आयपीएल जिंकेल याची मला खात्री आहे,’ असे रैनाने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले. रैनाने वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

धोनीची विशेष कामगिरी

धोनी आयपीएलच्या आतापर्यंतच्या प्रत्येक मोसमात खेळला असून चेन्नईकडून खेळताना त्याचे हे ११ वे वर्ष आहे. त्याने प्रत्येक मोसमात चेन्नईचे नेतृत्व केले आहे, हे विशेष. तो २०१६ आणि २०१७ च्या आयपीएल मोसमात रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला होता. धोनीने हैदराबादच्या सामन्याआधी आयपीएलमध्ये १९३ सामने खेळले होते, ज्यात त्याने ४२.२२ च्या सरासरीने ४४७६ धावा केल्या होत्या. यात २३ अर्धशतकांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -