घरक्रीडाViral Video: धोनीच्या हातची पाणी पुरी

Viral Video: धोनीच्या हातची पाणी पुरी

Subscribe

एकीकडे भारतीय संघाची न्यूझीलंड विरुद्ध वन-डे सामना हॅमिल्टनच्या मैदानावर सुरू आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या धोनी हा आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत मालद्विवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वी धोनी बोट चालवतानाचा व्हिडिओमध्ये दिसला होता. आता तो मित्रांना पाणी पुरी खाऊ घालताना दिसत आहे. माजी क्रिकेटर आरपी सिंग आणि पीयूष चावला यांना पाणी पुरी खायला घातली.

- Advertisement -

या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहून शकता की धोनी आपल्या हाताने पाणी पुरीत बटाट घालत आहे आणि तिखट पाणी त्यात टाकून मित्रांच्या प्लेटमध्ये ठेवतात दिसत आहे. या व्हिडिओमुळे नेटकरी धोनीचे कौतुक करत आहे. ४ फेब्रुवारीला धोनीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला होता.

- Advertisement -

चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत असून त्यांना पीयूष चावला आणि धोनी एकत्र पाहून आनंद झाला आहे. एका वापरकर्त्याने लिहिलं की, ‘पाणी पुरी खाणारे किती भाग्यवान आहेत. मला खूप हेवा वाटतं आहे.’ तर दुसरा वापरकर्ता म्हणतो, ‘धोनी लवकर मैदानावर खेळताना दिसं. आम्हाला तुला खेळताना पाहण्याची इच्छा आहे.’

९ जुलै रोजी झालेल्या विश्वचषक उपांत्य सामन्यात न्यूझीलंडनकडून भारताचा पराभव झाल्यापासून धोनी कोणत्याही सामन्यात खेळलेला नाही. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. धोनीला बीसीसीआयच्या करार यादीतून वगळण्यात आले आहे. मात्र धोनीचे चाहते त्याला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी आतुरतेने वाढ पाहत आहेत.


हेही वाचा – जागतिक कर्करोग दिन: या सेलिब्रिटींनी केली कर्करोगावर मात


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -