घरक्रीडाअमर संदेश उपांत्यपूर्व फेरीत

अमर संदेश उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

मुंबई शहर निवड चाचणी कबड्डी

अमर संदेश स्पोर्ट्स क्लब, जय भारत सेवा मंडळ, ओम पिंपळेश्वर क्रीडा मंडळ, श्री साई क्रीडा मंडळ या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरूष द्वितीय श्रेणी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. नायगावच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जय भारताने गणेश स्पोर्ट्सचे आव्हान ४३-३६ असे परतवून लावले. त्यांच्या या विजयात यश सावंत, चेतन परब, राहुल पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अमर संदेश स्पोर्ट्सने ओम श्री साईनाथ ट्रस्टचा ३३-१५ असा धुव्वा उडवला. पहिल्या डावात १७-८ अशी आघाडी घेणार्‍या अमर संदेशने उत्तरार्धातही अप्रतिम खेळ करत हा सामना जिंकला. त्यांच्याकडून विकास गुप्ता, पंकज सिंह, अभिषेक पाल यांनी अप्रतिम खेळ केला. ओम पिंपळेश्वरने श्री स्वामी समर्थचा ३६-२७ असा पराभव केला.

- Advertisement -

गणेश गुप्ता, चेतन गावकर हे खेळाडू ओम पिंपळेश्वरच्या या विजयात चमकले. श्री साई क्रीडा मंडळाने काळेवाडीचा विघ्नहर्ता संघाला ३०-१८ असे नमवले. स्वप्नील पवार, जितेश सांगडे यांनी चढाईत आणि पराग नांगलीने पकडीत उत्तम खेळ केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -