घरक्रीडामुंबई क्रिकेट अकादमीने जिंकला एसआरटी चषक

मुंबई क्रिकेट अकादमीने जिंकला एसआरटी चषक

Subscribe

एम के क्रिकेट अकादमीविरुद्धच्या तीन अंतिम सामन्याच्या मालिकेतील दोन सामने जिंकून यजमान मुंबई क्रिकेट अकादमीने १४ वर्षांखालील वयोगटासाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत बाजी मारत एसआरटी चषकावर आपले नाव कोरले. तब्बल १२ संघांचा सहभाग असलेल्या मुंबई क्रिकेट अकादमी आयोजित एसआरटी चषक स्पर्धेची अंतिम लढत तीन सामन्याची खेळवण्यात आली.

मास्टर्स स्ट्रोक स्पोर्ट्सचा पुरस्कार मिळालेल्या या स्पर्धेतील एक सामना ४० षटाकांचा आणि दोन सामने टी २० क्रिकेटचे खेळवण्यात आले. या तीन सामन्यांमध्ये एका शतकासह १८९ धावा करणाऱ्या कुणाल नवरंगेला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. ठाणे शहरात मैदान उपलब्ध न झाल्याने स्पर्धेतील सर्व सामने मुंबईत खेळवण्यात आले.
४० षटकांच्या पहिल्या सामन्यात मुंबई क्रिकेट अकादमीने एम के क्रिकेट अकादमीचा १६७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्याच्या मालिकेत आघाडी मिळवली. कुणाल नवरंगेच्या १३७ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर विजेत्या संघाने प्रथम फलंदाजी करत ३८० धावांचा डोंगर रचला. शर्वज दुर्वेने ४५ आणि प्रथमेश वांद्रेने नाबाद ३३ धावा केल्या. या धावसंख्येला उत्तर देताना एम के क्रिकेट अकादमीच्या क्रिधांत नाईक (नाबाद ४३), अंश गुप्ता (३२) आणि सोहम कदमचा (२३) अपवाद वगळता इतर फलंदाजांना छाप पाडता आली नाही. कुणालने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवत तीन विकेट्स मिळवल्या. हर्ष सागठयानेही तीन विकेट्स मिळवत कुणालला चांगली साथ दिली.

- Advertisement -

एम के क्रिकेट अकादमीने पहिला टी २० सामना पाच विकेट्सने जिंकत चांगलीच चुरस निर्माण केली. प्रथम फलंदाजी मुंबई क्रिकेट अकादमीचे १०१ धावांचे आव्हान एम के क्रिकेट अकादमीने आकाश गौडा च्या २९ आणि तुषार टंकच्या ३१ धावांच्या जोरावर १०२ धावा करत पूर्ण केले. त्याआधी प्रज्वल जाधव आणि पियुष मिठबावकरने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवत प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. निर्णायक लढतीत मुंबई क्रिकेट अकादमीने शर्वज दुर्वेचे अर्धशतक (६६) आणि कुणाल नवरंगेच्या ४६ धावांच्या खेळीमुळे २० षटकात ९ बाद १७७ धावांचा पल्ला गाठला होता. एम. केच्या अमन गुप्ताने तीन आणि प्रज्वल जाधवने दोन विकेट्स मिळवल्या. त्यानंतर पार्थ घोणेने या चार विकेट्स मिळवत एम के संघाला अवघ्या २३ धावामध्ये गुंडाळत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

सर्वोत्तम खेळाडू
पार्थ घोणे ( गोलंदाज),
नीरज नौरियल (यष्टीरक्षक),
कुणाल नवरंगे (फलंदाज),
तुषार टंक ( अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ),
प्रथमेश वांद्रे (सर्वोत्तम अष्टपैलू ),
कुणाल नवरंगे (स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू),
शर्वज दुर्वे (मॅन ऑफ द सिरीज)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -