घरक्रीडाविजय पाटील बिनविरोध अध्यक्षपदी;जगदीश आचरेकर खजिनदारपदी

विजय पाटील बिनविरोध अध्यक्षपदी;जगदीश आचरेकर खजिनदारपदी

Subscribe

मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक

डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीचे डॉ. विजय पाटील यांची शुक्रवारी अधिकृतपणे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तसेच अमोल काळे यांची उपाध्यक्ष आणि संजय नाईक यांची सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

इतर उमेदवारांनी आधीच माघार घेतल्याने बाळ म्हाडदळकर गटाच्या या तीनही उमेदवारांची अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवपदी निवड होणार हे स्पष्ट झाले होते. शुक्रवारी उर्वरित जागांसाठी मतदान करण्यात आले. या निवडणुकीत बाळ म्हाडदळकर गट आणि युनायटेड फॉर चेंज हे दोन गट विरोधात होते.

- Advertisement -

मयांक खांडवाला यांच्याविरुद्ध १२८-१८९ असा विजय मिळवत जगदीश आचरेकर यांची खजिनदारपदी निवड झाल्याची घोषणा एमसीएचे निवडणूक अधिकारी डी. एन. चौधरी यांनी केली. तसेच सहसचिवपदासाठी संगम लाड आणि शाहआलम शेख यांच्यात शर्यत होती. यात शाहआलम १९६-१२१ अशी बाजी मारली.

डॉ. उन्मेष खानविलकर (२४१ मते), अजिंक्य नाईक (२०१), गौरव पय्याडे (१८०), विहंग सरनाईक (१६५), अभय हडप (१६०), कौशिक गोडबोले (१५७), अमित दाणी (१४४), नदीम मेमन (१४०) आणि येझदेगर्दी खोदादाद (१३३) यांची वरिष्ठ कौन्सिलचे सदस्य म्हणून निवड झाली.

- Advertisement -

लोढा समितीच्या सुधारणा शिफारशींच्या अंमलबजावणीमुळे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना पहिल्यांदा एमसीएच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळाली, ज्यात काही महिला क्रिकेटपटूंचाही समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -