घरक्रीडामुलांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्र, मुलींमध्ये श्री समर्थला जेतेपद

मुलांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्र, मुलींमध्ये श्री समर्थला जेतेपद

Subscribe

मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

लायन्स क्लब ऑफ माहीम आणि मुंबई खो-खो संघटनेने संयुक्तपणे आयोजित केलेल्या सब-ज्युनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्राने, तर मुलींमध्ये श्री समर्थ व्यायाम मंदिराने जेतेपद पटकावले. मुलांमध्ये विद्यार्थीच्या हर्ष कामतेकरला आणि मुलींमध्ये श्री समर्थच्या प्रणाली मेंढीला स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

परळ येथे झालेल्या या स्पर्धेतील मुलांच्या अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने युवक क्रीडा मंडळावर ११-८ (५-२) असा जादा डावात ३ गुणांनी पराभव केला. मध्यंतराला २-२ अशी बरोबरी असताना दुसर्‍या डावात विद्यार्थीने ४ गुण मिळवत सामन्यात आघाडी घेतली.

- Advertisement -

मात्र, युवकच्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन केल्याने नियमित सामन्याअखेरीस ६-६ अशी बरोबरी होती. त्यानंतर झालेल्या जादा डावात विद्यार्थीने ५-२ अशी मारत या गटाचे जेतेपद मिळवले. त्यांच्या या विजयात हर्ष कामतेकर (५:२०, २:१० मिनिटे संरक्षण), अथर्व पालव (१:१०, ४:३० मिनिटे संरक्षण आणि १ बळी), जनार्दन सावंत (२ बळी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तिसर्‍या क्रमांकाच्या लढतीत ओम समर्थ व्यायाम मंदिराने अमर हिंद मंडळाचा ८-२ असा पराभव केला.

मुलींच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने अमर हिंद मंडळाला ४-२ असे पराभूत केले. श्री समर्थकडून प्रणाली मेंढीने (२:१०, ५:१० मिनिटे संरक्षण आणि १ बळी), आकांक्षा कोकाश (४:५०, १:४० मिनिटे संरक्षण), मधुरा मालप (२ बळी) यांनी चांगला खेळ केला. तिसर्‍या क्रमांकाच्या लढतीत ओम साईश्वरने सरस्वती मंदिर हायस्कूलचा २-१ असा दोन मिनिटे राखून पराभव केला.

- Advertisement -

अष्टपैलू खेळाडू :
मुले – हर्ष कामतेकर (विद्यार्थी क्रीडा केंद्र), मुली – प्रणाली मेंढी (श्री समर्थ व्यायाम मंदिर)

सर्वोकृष्ट संरक्षक :
मुले – ओंकार घवाळी (युवक क्रीडा मंडळ), मुली – रुद्रा नाटेकर (अमर हिंद मंडळ)

सर्वोकृष्ट आक्रमक :
मुले – जनार्दन सावंत (विद्यार्थी क्रीडा केंद्र), मुली – मधुरा मालप (श्री समर्थ व्यायाम मंदिर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -