घरक्रीडागिरीष तांबेला जेतेपद

गिरीष तांबेला जेतेपद

Subscribe

 मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन कॅरम स्पर्धा

बॉम्बे वाय.एम.सी.ए. (प्रोक्टर ब्रँच) आयोजित सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुषांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गिरीष तांबेने जेतेपद पटकावले. महिलांमध्ये जैन इरिगेशनच्या निलम घोडकेने बाजी मारली. तिने या गटाच्या अंतिम सामन्यात आपली सहकारी मिताली पिंपळेवर २५-६, २५-१९ असा विजय मिळवला. सात दिवस खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत १२ ब्रेक टू फिनिश आणि ५ ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली.

आग्रीपाडा येथे झालेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात दुसर्‍या सीडेड गिरीष तांबेने बिनसीडेड एअर इंडियाच्या झैद अहमदवर २५-९, ९-२५, २५-१५ अशी मात केली. गिरीषला पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्यात यश आले. त्यामुळे त्याने चषक आणि रोख रकमेचे पारितोषिक आपल्या नावे केले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत गिरीषने जागतिक आणि राष्ट्रीय विजेत्या प्रशांत मोरेचा २५-१७, २५-१६ असा, तर झैद अहमदने विकास धारियाचा २५-१६, २५-१७ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -