घरक्रीडामुंबई-कर्नाटक लढत रंगतदर अवस्थेत

मुंबई-कर्नाटक लढत रंगतदर अवस्थेत

Subscribe

अत्तरदेचे 5 बळी

पहिल्या डावात 24 धावांची नाममात्र आघाडी घेणार्‍या कर्नाटकाने रणजी करंडकाच्या लढतीत दुसर्या डावातही मुंबईचे 4 मोहरे 26 धावांतच टिपले होते.परंतु,मुंबई संघात पुनरागमन करणार्‍या सर्फराज खानने दमदार अर्धशतक झळकावत शम्स मुलानीसोबत 83 धावांची भागिदारी केली.दुर्देवाने दिवसाच्या अखेरच्या षटकात शम्स मुलानीला कौशिकने स्लीपमधील अभिषेक रेड्डीकरवी झेलबाद केल्यामुळे दुसर्‍या दिवसअखेरीस मुंबईची अवस्था 5 बाद 109 अशी झाली.मुंबईसाठी धक्कादायक बाब म्हणजे कसोटीपटू पृथ्वी शॉ खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यात फलंदाजी करू शकणार नाही.

शंशाक अत्तरदेच्या भेदक फिरकीमुळे कर्नाटकाचा डाव 218 धावांतच आटोपला.प्रथमश्रेणी क्रिकेटच्या आपल्या दुसर्‍या सामन्यात जळगावच्या या युवकाने 58 धावांतच कर्नाटकाचा निम्मा संघ गारद केला.बीकेसीची खेळपट्टी तेज तसेच फिरकी गोलंदाजांना सहाय्यकारी ठरत आहे.तसेच नीट एकाग्र चित्ताने खेळ केल्यास या खेळपट्टीवर धावा होऊ शकतात,याची प्रचिती समर्थच्या फलंदाजीने आली.कर्नाटकाच्या या सलामीवीराने 139 चेंडूत 13 चौकारांसह 86 धावा केल्या.यष्टीरक्षक फलंदाज शरथची 54 चेंडूतील 46 धावांची खेळी कर्नाटकासाठी निर्णायक ठरली.1 षटकार 7 चौकार हे त्याचे प्रमुख फटके.त्यानेच कर्नाटकाचे द्विशतक फलकावर लावताना संघाला आघाडी मिळवून दिली.प्रदीर्घ कालावधीनंतर छोट्या चणीच्या या यष्टीरक्षक- फलंदाजाने जीगरबाज खेळ केला.अत्तरदे,मुलानी या फिरकी जोडगोळीने कर्नाटकाला 218 धावांवर रोखले.

- Advertisement -

यंदाच्या मोसमातील लागोपाठ दुसर्‍या सामन्यात ‘रेल्वेपाठोपाठ मुंबईच्या ठिसूळ फलंदाजीचे प्रदर्शन दिसून आले.अजिंक्य राहणे,आदित्य तरे या सलामीवीरांना झटपट माघारी पाठवण्यात कर्नाटकी तेज गोलंदाजांनी यश लाभले.मिथुनने अजिंक्यला पायचित पकडले तर सिद्धेश लाडचा स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याने झेल टिपला.कर्णधार सुर्यकुमार यादवने 10 धावा काढत निराशा केली.मिथुननेच त्याला यष्टीरक्षक शरथकरवी झेलबाद केले.

धावफलक:-

- Advertisement -

मुंबई- 194 आणि 5 बाद 109,(सर्फराज खान खेळत आहे 53,शम्स मुलानी 31;)

(मिथुन-11-2-52-3,कौशिक,9-5-11-2) वि.कर्नाटका 218.(समर्थ 86,पड्डीकल 32,गोपाल31,शरथ 46)

(अत्तरदे-18.5-3-58-5,शम्स मुलानी- 21-4-55-3,)

जखमी पृथ्वी शॉ गेला बेंगलोरला

मुंबईचा संघ अडचणीत सापडला असताना कसोटीवीर पृथ्वी शॉची उणीव मुंबईला प्रकर्षाने जाणवेल.बीकेसीवरील मुंबई-कर्नाटका सामन्यात पहिल्याच दिवशी क्षेत्ररक्षणादरम्यान डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्यामुळे पृथ्वीला बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचारांसाठी पृथ्वी दुपारच्या विमानाने बेंगलोरला रवाना झाला.संघ अडचणीत असताना मुंबई क्रिकेट असोसिएशच्या पदाधिकार्‍यांनी बीसीसीआयच्या मेलला उत्तर न देताच पृथ्वीला बेंगलोरला पाठवले. याबाबत क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -