मुंबईच्या गोकुळ यादवची बाजी

Mumbai
राज्य ग्रीको रोमन कुस्ती

कुर्ला येथे झालेल्या सिनियर ग्रीको रोमन राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ७७ किलो वजनी गटात मुंबई उपनगरच्या गोकुळ यादवने बाजी मारली. त्याने अंतिम सामन्यात सांगलीच्या सचिन खोतचा पराभव केला. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेमध्ये २७८ मल्लांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७ आणि १३० किलो या वजनी गटांमध्ये पार पडली.

या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी केली. कोल्हापूरच्या अभिजित पाटील (६० किलो), विक्रम कुरहाडे (६३ किलो), विशाल कुंडेकर (६७ किलो), समीर पाटील (७२ किलो), शिवाजी पाटील (८२ किलो) यांनी जेतेपद मिळवले. १३० किलो वजनी गटात अर्जुन साठेने बाजी मारली. ६३ किलो वजनी गटात मुंबई उपनगच्या शुभम धमाळ आणि गोविंद यादव यांनी तिसरा क्रमांक मिळवला.

स्पर्धेचा निकाल –

५५ किलो : १) अनिल तोडकर (अमरावती), २) विठ्ठल कांबळे (कोल्हापूर), ३) अनिल पाटील (कोल्हापूर), चेतन मगरजे (लातूर)

६० किलो : १) अभिजित पाटील (कोल्हापूर), २) प्रवीण डोंगळे (कोल्हापूर), ३) प्रशांत शिंदे (सातारा), अनिकेत मगर (सोलापूर)

६३ किलो : १) विक्रम कुरहाडे (कोल्हापूर), २) प्रतीक आवारे (पुणे), ३) शुभम धमाळ (मुंबई उपनगर), गोविंद यादव (मुंबई उपनगर)

६७ किलो : १) विशाल कुंदेकर (कोल्हापूर), २) ओंकार शिंदे (सातारा), ३) कुंदन यादव (मुंबई उपनगर), आतिश आडकर (पुणे)

७२ किलो : १) समीर पाटील (कोल्हापूर), २) आबा शेंडगे (पुणे), ३) अक्षय शिंदे (सातारा), संजय वाघमोडे (सोलापूर)

७७ किलो : १) गोकुळ यादव (मुंबई उपनगर), २) सचिन खोत (सांगली), ३) सनी मेढे (नाशिक), सागर पाटील (कोल्हापूर)

८२ किलो : १) शिवाजी पाटील (कोल्हापूर), २) मयूर गायकवाड (सांगली), ३) जयदीप जोशिलकर (कोल्हापूर), अमोल मुंढे (बीड)

८७ किलो : १) बाळू सपाटे (सोलापूर), २) अभिषेक फुगे (पिंपरी चिंचवड), ३) अक्षय जाधव (पुणे), योगेश शिंदे (पुणे)

९७ किलो : १) सतीश मुडे (सांगली), २) विवेक यादव (मुंबई उपनगर), ३) सारंग सोनटक्के (सोलापूर), नागेश शिंदे (उस्मानाबाद)

१३० किलो : १) अर्जुन साठे (सोलापूर), २) तुषार वरखडे (पुणे), ३) अनिकेत मांगडे (पुणे), सुभाष गाढवे (अहमदनगर)