घरक्रीडामुशफिकूर रहीमचे विक्रमी द्विशतक

मुशफिकूर रहीमचे विक्रमी द्विशतक

Subscribe

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मुशफिकूर रहीमने २१९ धावांची खेळी केली.

बांगलादेशचा यष्टीरक्षक मुशफिकूर रहीमने नवा विक्रम केला आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २१९ धावांची खेळी केली. बांगलादेशच्या फलंदाजाने केलेली ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

शाकिबचा विक्रम मोडला

बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम शाकिब उल हसनच्या नावावर होता. शाकिबने २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २१७ धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात मुशफिकूर रहीमने १५९ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रहीमने ४२१ चेंडूंत १८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २१९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे बांगलादेशने पहिल्या डावात ५२२ धावांचा डोंगर उभारला.

 

- Advertisement -

२ द्विशतके करणारा एकमेव यष्टीरक्षक

मुशफिकूर रहीमचे हे कसोटी क्रिकेटमधील दुसरे द्विशतक होते. कसोटी क्रिकेटमध्ये २ द्विशतक करणारा रहीम हा पहिला यष्टीरक्षक-फलंदाज आहे. याआधी त्याने २०१३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २०० धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात मोहम्मद अशरफूलने १९० धावा करत रहीमला चांगली साथ दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -