घरक्रीडाआयओएच्या युवा कमिशनमध्ये महाराष्ट्राचे नामदेव शिरगावकर

आयओएच्या युवा कमिशनमध्ये महाराष्ट्राचे नामदेव शिरगावकर

Subscribe

भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष, तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सहसचिव नामदेव शिरगावकर यांची आयओएच्या युवा कमिशनमध्ये निवड झाली आहे. आयओएच्या युवा कमिशनमध्ये शिरगावकर यांच्यासह दुश्यंत चौटाला, विराज दास आणि चांदसिंग टोकस यांचा समावेश आहे. या चौघांना युवा खेळाडू घडवण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्राचे नामदेव शिरगावकर हे भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष असून आयओएचे सहसचिव आहेत. आयओएतील सर्वात युवा पदाधिकारी म्हणून ते ओळखले जातात. आता त्यांची चार सदस्यीय युवा कमिशनमध्ये निवड झाली आहे. युवा कमिशनच्या अध्यक्षपदी हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय टेबल टेनिस महासंघाचे अध्यक्ष दुष्यांत चौटाला यांची नेमणूक झाली आहे. युवा कमिशनच्या माध्यमातून भविष्यातील ऑलिम्पियन्स शोधण्याचे, युवा खेळाडूंमधील गुण हेरुन त्यांना मार्गदर्शन करण्याचे आणि त्यांना घडवण्याचे काम आम्ही करू, असा विश्वास नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -