घरक्रीडाकोहलीच्या चॅलेंजसाठी मोदी सज्ज

कोहलीच्या चॅलेंजसाठी मोदी सज्ज

Subscribe

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केले आहे. हे फिटनेस चॅलेंज त्यांनी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीलादेखील दिले होते. विराट कोहलीने राज्यवर्धन सिंह राठोड यांचे चॅलेंज स्वीकारत पूर्णदेखील केले. फिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर विराटने आणखी तीन जणांना यामध्ये टॅग केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलेदेखील आहे. कोहलीने पंतप्रधान नरेंद मोदी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अनुष्का शर्मा यांना टॅग करुन हे चॅलेंज दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात गुरुवारी ट्विट करत म्हटले की, ’’विराट कोहली मी तुमचे चॅलेंज स्वीकारत आहे. लवकरच मी माझा फिटनेस चॅलेंज व्हिडीओ शेअर करेन’’.

- Advertisement -

दरम्यान, अनुष्काकडून फिटनेसचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. तरी एमएस धोनीकडून उत्तर अद्याप मिळालेले नाही. विराटने आपला फिटनेस चॅलेंज व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरदेखील केला आहे. ’मिस्टर राठोड मी तुमचे चॅलेंज स्वीकारत आहे’, असे विराटने व्हिडीओच्या सुरुवातीला म्हटले आणि एक्सरसाईज करण्यास सुरुवात केली. व्हिडीओमध्ये कोहली स्पायडर प्लँक करताना दिसत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली हा यंदाच्या काऊंटी क्रिकेट स्पर्धेत सरे या संघाकडून खेळणार होता. मात्र स्लिप डिस्कमुळे आता तो काऊंटी क्रिकेट खेळणार नाही. मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे या स्पर्धेनंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार होता. या संघाचे नेतृत्व कोहली करणार होता. परंतु त्याच्या दुखापतीमुळे कोहलीच्या या दौऱ्यातील सहभागावर प्रशचिन्ह उपस्थित झाले आहे. १५ जूननंतर विराटची तंदुरुस्ती चाचणी म्हणजेच फिटनेस टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या इंग्लंड दौऱ्यातील सहभागावर बीसीसीआय निर्णय घेणार आहे.

डॉक्टरांनी विराटला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र विराटवर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे वृत्त मात्र डॉक्टरांनी फेटाळून लावले आहे. विराटने डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर काऊंटी क्लब सरेला खेळणार नसल्याचे कळवले आहे. बीसीसीआयनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

मेडिकल रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीला काऊंटी खेळण्याची संधी गमवावी लागणार आहे. गेल्या १२ महिन्यांपासून सलग क्रिकेट खेळत असलेल्या विराट कोहलीने स्लिप डिस्कसंबंधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी खारमधील एका रुग्णालयला भेट दिली. तेथील तज्ञ डॉक्टरांनी विराटची तपासणी केली. एका वृत्तानुसार, मेडिकल रिपोर्टमध्ये विराटच्या मणक्याला दुखापत झाली असल्याचे आढळले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -