नाशिक जिमखान्याने पटकावला हकीम मर्चंट चषक

Mumbai
नाशिक जिमखाना संघ

नाशिक जिमखाना संघाने जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने व मेसन डेव्हलपर्सच्या सहकार्याने आयोजित हकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी एनडीसीए मॉर्निंग संघाचा ८५ धावांनी पराभव केला.

५० षटकांच्या या अंतिम सामन्यात नाशिक जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण तेजस पवार आणि मित पटेलने ३-३ विकेट घेतल्यामुळे नाशिक जिमखाना संघ १६७ धावांतच गारद झाला. त्यांच्याकडून विकास वाघमारेने ३३ तर सुजय महाजनने ३१ धावा केल्या.

१६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रणजीपटू सत्यजित बच्छावच्या भेदक मार्‍यामुळे एनडीसीए मॉर्निंग संघाचा डाव ८२ धावांतच आटोपला. त्यामुळे नाशिक जिमखान्याने हा सामना जिंकत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सत्यजितने १५ धावांमध्ये ५ गडी बाद केले. त्याला गौरव काळेने ४ गडी बाद करत उत्कृष्ट साथ दिली.