राष्ट्रीय कॅरम स्पर्धा आजपासून

Mumbai
राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

मंगळवार १९ फेब्रुवारीपासून कुडाळ येथे वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतर-राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पाच दिवस चालणार्‍या या स्पर्धेत संपूर्ण भारतातून २५ राज्य आणि १३ संस्थांच्या २८८ पुरुष व १९५ महिला खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर हे स्वतः स्वित्झरलंडहून या स्पर्धेसाठी पाचही दिवस उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे उदघाटन मंगळवारी सकाळी ९:३० वाजता होईल.

विद्यमान विश्व विजेता प्रशांत मोरे आणि महिला विश्व विजेती अपूर्वा हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहेत. त्यांच्यासोबत माजी विश्व विजेते आर. एम. शंकरा (एअर इंडिया), रश्मी कुमारी, योगेश परदेशी आणि इलवझकी (सर्व पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड) असे जवळपास २० आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

पुढील वर्षी मलेशिया येथे पाचवी विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धा होणार असल्याने संघ निवडीसाठी या स्पर्धेची कामगिरीही विचारात घेतली जाणार असल्याचे अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या महासचिव भारतीय नारायण यांनी सांगितले. या स्पर्धेतील महत्वाचे सामने दररोज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtrcarromasociation या युट्युब चॅनलवरून थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here