घरक्रीडाNational Junior Athletics : व्हीपीएमच्या पूर्णा रावराणेचा विक्रम थोडक्यात हुकला

National Junior Athletics : व्हीपीएमच्या पूर्णा रावराणेचा विक्रम थोडक्यात हुकला

Subscribe

पूर्णा रावराणेने रांची येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक या खेळात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

दहिसर येथील व्हीपीएम स्पोर्ट्स क्लबच्या पूर्णा रावराणेने रांची येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक या खेळात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पूर्णाने १७ ते १८ वर्षांतील मुलींच्या वयोगटात गोळाफेकमध्ये १५.३० मीटर लांब गोळाफेक करत सुवर्णपदक पटकावले.

या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी

पूर्णा रावराणेने केलेली १५.३० मीटर लांब गोळाफेक ही तिची या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तिने या स्पर्धेत केलेली कामगिरी इतकी दमदार होती की ती राष्ट्रीय विक्रम मोडण्यापासून अवघ्या ०.६९ मीटर अंतराने चुकली.

राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत २ पदके

पूर्णाने मागील काही काळात अतिशय चांगले प्रदर्शन केले आहे. तिने मागील महिन्यात झालेल्या राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेकमध्ये सुवर्ण आणि थाळीफेकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. तिच्या या कामगिरीमुळे तिला या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक मिळाले होते. तसेच या कामगिरीमुळेच तिची राष्ट्रीय ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिने राष्ट्रीय ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवत आपण चांगल्या फॉर्मात असल्याचे दाखवून दिले आहे. ही तिची कामगिरी तिला पुढे होणाऱ्या १९ वर्षांखालील ‘खेलो इंडिया’ या स्पर्धेसाठी आत्मविश्वास उंचावणारी ठरणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -