स्वाती शिंदे महाराष्ट्राच्या संघात

२३ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

Mumbai

स्वाती शिंदेची २३ वर्षांखालील फ्री-स्टाईल, ग्रीको-रोमन आणि मुली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा २६ ते २९ सप्टेंबर या कालावधीत शिर्डी येथे पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धा नुकतीच पुणे येथे पार पडली. या चाचणी स्पर्धेत राज्यातील १५० कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत दमदार कामगिरी करणार्‍या कुस्तीपटूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी हा संघ जाहीर केला. या संघाचे व्यवस्थापक म्हणून सुनील चौधरी आणि सुभाष ढोणे काम करतील. तसेच भरत मेकाले, माधुरी घराळ, हनुमंत जाधव आणि दिलीप इटनकर हे या संघाचे मार्गदर्शक असतील.

महाराष्ट्र संघ –

*फ्री-स्टाईल : अबासाहेब अटकळे (५७ किलो), सुरज कोकाटे (६१ किलो), निखिल कदम (६५ किलो), शुभम थोरात (७० किलो), कुमार शेलार (७४ किलो), रामचंद्र कांबळे (७९ किलो), विवेक नायकल (८६ किलो), सिकंदर शेख (९२ किलो), अक्षय गरुड (९७ किलो), आदर्श गुंड (१२५ किलो)

* ग्रीको-रोमन : बाप्पू कोळेकर (५५ किलो), सद्दाम शेख (६० किलो), कुंदन यादव (६३ किलो), विशाल कोंडेकर (६७ किलो), उदय शेळके (७२ किलो), दिनेश मोकाशी (७७ किलो), विपूल गुंडगे (८२ किलो), रोहन रंडे (८७ किलो), हर्षवर्धन सदगिर (९७ किलो), तुषार दुबे (१३० किलो)

*फ्री-स्टाईल मुली : स्वाती शिंदे (५० किलो), नंदिनी साळोखे (५३ किलो), अंकिता शिंदे (५५ किलो), प्रतिक्षा देबाजे (५७ किलो), अंकिता गुंड (५९ किलो), रेश्मा माने (६२ किलो), मनाली जाधव (६५ किलो), ऋतुजा संकपाळ (६८ किलो), हर्षदा जाधव (७२ किलो), प्रिया गुशिंगे (७६ किलो)