घरक्रीडानीरज चोप्रा खेलरत्न पुरस्काराचा दावेदार

नीरज चोप्रा खेलरत्न पुरस्काराचा दावेदार

Subscribe

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला यावर्षीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला यावर्षीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याच्यासोबत वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया हे सुद्धा खेलरत्न पुरस्काच्या शर्यतीत आहेत.

२०१८ मध्ये अप्रतिम कामगिरी 

नीरज चोप्राने २०१८ वर्षात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने यावर्षीच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि एशियाड स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. एशियाड स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकताना त्याने ८८.०६ मी लांब भालाफेक करत राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला होता. त्यामुळेच त्याला खेलरत्न पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

बजरंग पुनियाचीही चमकदार कामगिरी

बजरंग पुनियाने २०१८ मध्ये चार सुवर्ण पदकांची कमाई केली होती. त्याने एशियाडमध्येही सुवर्ण पदक मिळवले होते. एशियाडच्या ६५ किलो वजनी गटात त्याने सुवर्ण पदक मिळवले होते.

नेहमी राष्ट्रीय क्रीडा दिवशी म्हणजेच २९ ऑगस्टला पार पडणारा हा पुरस्कार समारंभ यावर्षी २५ सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -