घरक्रीडानीरज यादवची नाशिकरोड मॅरेथॉनमध्ये बाजी

नीरज यादवची नाशिकरोड मॅरेथॉनमध्ये बाजी

Subscribe

नीरज यादवने विशो फिटनेस मंत्रा आयोजित नाशिकरोड मॅरेथॉनमध्ये १० किमीच्या १८ ते ४० वर्षे वयोगटात बाजी मारली. या स्पर्धेला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांमध्ये व्यायामाबरोबरच आहाराबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये १२०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या मॅरेथॉनमध्ये फॅमिली फन रन ते व्यावसायिक अशा विविध गटांचा समावेश होता.

बबलू शेलार यांच्या हस्ते ध्वज दाखवून या मॅरेथॉनला प्रारंभ झाला. विशो फिटनेस मंत्राचे संचालक आणि मॅरेथॉनचे आयोजक विशाल मोटकरी यांनी मॅरेथॉन शहर म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या नाशिकविषयी मनोगत व्यक्त करत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. नाशिकरोड परिसरातील मनपा शाळा क्रमांक, १२ अच्या मैदानावर सकाळी ५ वाजेपासून स्पर्धक जमले. त्यांचा झुम्बा ट्रेनर पवन मंगोली यांनी विशेष वॉर्म-अप घेतला. नगरसेवक गजानन शेलार, श्याम कोल्हे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

- Advertisement -

मॅरेथॉनचे निकाल :
(१८ ते ४० वयोगट) १० किमी (पुरुष) – १) नीरज यादव, २) सुनील निघोत, ३) कमलाकर देशमुख
(१८ ते ४० वयोगट) १० किमी (महिला) – १) निवृत्ता दहवाड, २) माधुरी काळे, ३) प्राची देशमुख
(४१ वरील वयोगट) १० किमी (पुरुष) – १) अशोक पवार, २) बद्रीप्रसाद वाबळे, ३) हेमंत अपसुंदे
(४१ वरील वयोगट) १० किमी (महिला) – १) नितु सिंग, २) आरती चौधरी, ३) मीना भोपे
(१२ ते ४० वयोगट) ५ किमी (पुरुष) – १) किसन माळी, २) वेदांत ताजणे, ३) योगेश जाधव
(१२ ते ४० वयोगट) ५ किमी (महिला) – १) ऋतुजा माने, २) कोमल कळसकर, ३) स्तुती चावला
(४१ वरील वयोगट) ५ किमी (पुरुष) – १) रवींद्र आहेर, २) अतुल जंत्रे, ३) पुरुषोत्तम शेट्टी
(४१ वरील वयोगट) ५ किमी (महिला) – १) प्रतिभा क्षत्रिय, २) सोनाली सहानी, ३) वंदना त्रिपाठी
ज्येष्ठ नागरिक ३ किमी : (पुरुष) – १) काशीनाथ पाळदे; (महिला) – १) ललिता सेठी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -