नशीब होते म्हणून वाचलो !

ख्राइस्टचर्च हल्ल्याबाबत बांगलादेशी खेळाडूंची प्रतिक्रिया

Mumbai
Khalid Masood

न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च शहरातील अल नूर आणि लिंगवूड मशिदीवर शुक्रवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात ४९ लोक ठार झाले, तर कित्येक जखमी झाले. यापैकी अल नूर मशिदीपासून न्यूझीलंड दौर्‍यावर असलेला बांगलादेशी क्रिकेट संघ जवळच्याच अंतरावर होता. या हल्ल्यानंतर ख्राइस्टचर्चमध्येच शनिवारपासून सुरू होणारा न्यूझीलंड आणि बांगलादेशमधील तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. तसेच आमचे नशीब होते म्हणून आम्ही वाचलो, असे बांगलादेशचे संघ व्यवस्थापक खालिद मसूद म्हणाले.

आम्ही अशाप्रकारच्या दुर्घटनेचा कधी विचारही केला नव्हता किंवा अशी दुर्घटना जगात कुठेही व्हायला नको. आम्ही खूप नशीबवान होतो. आमच्या संघाचे जवळपास १७ सदस्य हे बसमध्ये होतो. सौम्या सरकारही तिथेच होता. आम्ही नमाजसाठी मशिदीत जात होतो. फक्त दोन खेळाडू (लिटन दास आणि नईम हसन तसेच फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी) हे हॉटेलमध्येच थांबले होते. बाकी सर्व खेळाडू हे नमाजसाठी आले होते. आम्ही मशिदीच्या खूपच जवळ होतो आणि आम्ही बसमधून मशीद पाहू शकत होतो. आमचे नशीब चांगले होते. जर आम्ही तिथे ३-४ मिनिटे आधी पोहोचलो असतो तर गोळीबार झाला त्यावेळी आम्ही मशिदीत असतो. या हल्ल्यात आमच्या कोणत्याही सदस्याला इजा झाली नाही हे आमचे नशीब होते. पण, आम्ही जे पाहिले ते एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणेच होते. आम्ही मशिदीतून काही लोकांना धावत बाहेर येताना पाहिले. आम्हीही साधारण ८-१० मिनिटे बसमध्ये थांबलो होतो आणि आमच्यावरही गोळीबार होऊ शकेल म्हणून आमची डोकं खाली घालून बसलो होतो, असे खालिद मसूद यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here