घरक्रीडान्यूझीलंड आयपीएलच्या आयोजनास तयार! 

न्यूझीलंड आयपीएलच्या आयोजनास तयार! 

Subscribe

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भारतामध्ये यंदा आयपीएल होणे अवघड असल्याची चर्चा आहे.

युएई आणि श्रीलंकेपाठोपाठ आता न्यूझीलंडने यंदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आयपीएल मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. परंतु, ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडल्यास या काळात आयपीएल होऊ शकेल. परंतु, भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भारतामध्ये यंदा आयपीएल होणे अवघड असल्याची चर्चा आहे. भारतात शक्य न झाल्यास परदेशात या स्पर्धेच्या आयोजनास बीसीसीआय तयार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.

खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची

आयपीएल भारतातच आयोजित करण्याला आमची पहिली पसंती आहे. मात्र, हे शक्य न झाल्यास आयपीएल परदेशात घेण्याचा आम्ही विचार करू. युएई आणि श्रीलंकेपाठोपाठ आता न्यूझीलंडने यंदा आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही त्यांच्या आरोग्याशी खेळणार नाही. आम्ही प्रसारक, फ्रेंचायझीस यांच्याशी सविस्तर चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ, असे बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

- Advertisement -

याआधीही परदेशात झाली स्पर्धा 

आयपीएल याआधीही परदेशात झाली आहे. लोकसभा निवडणूकीमुळे २००९ सालचा संपूर्ण मोसम दक्षिण आफ्रिकेत झाला होता, तर याच कारणास्तव २०१४ मोसमाचे सुरुवातीचे काही सामने युएईमध्ये झाले होते. यंदा आयपीएल भारतात होणे शक्य नसल्यास ही स्पर्धा पुन्हा युएईमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे फारच कमी रुग्ण असल्याने इथेही स्पर्धा आयोजित करण्याचा बीसीसीआय विचार करु शकेल. मात्र, यात एक अडचण म्हणजे न्यूझीलंड आणि भारतात साडेसात तासांचा फरक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -