घरIPL 2020IPL 2020 : मोहम्मद शमीसारखा यॉर्कर कुणीही टाकू शकत नाही!

IPL 2020 : मोहम्मद शमीसारखा यॉर्कर कुणीही टाकू शकत नाही!

Subscribe

शमीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २८ धावांच्या मोबदल्यात २ विकेट घेतल्या.  

किंग्स इलेव्हन पंजाब संघाने यंदाच्या मोसमाची निराशाजनक सुरुवात केली होती. त्यांना सुरुवातीच्या सात सामन्यांत केवळ एक सामना जिंकता आला होता. मात्र, त्यानंतर पंजाबच्या संघाने त्यांचा खेळ उंचावत सलग तीन सामने जिंकले आहेत. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स यांच्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स संघावर मात केली. मंगळवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात पंजाबने दिल्लीचा ५ विकेट राखून पराभव केला. पंजाबच्या या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने ४ षटकांत २८ धावांच्या मोबदल्यात २ विकेट घेतल्या. त्याने मुंबईविरुद्ध सुपर ओव्हरमध्येही अप्रतिम गोलंदाजी करताना पाच धावा रोखल्या होत्या. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने शमीचे कौतुक केले.

शमीची कामगिरी कौतुकास्पद 

सध्याच्या घडीला शमी हा आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम यॉर्कर टाकणारा गोलंदाज आहे. त्याच्यासारखा यॉर्कर सध्या कुणीही टाकत नाहीये. त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात ज्याप्रमाणे सुपर ओव्हर टाकली होती, ते वाखाणण्याजोगे होते. इतक्या कमी धावा रोखणे सोपे नव्हते, पण शमीने ते केले. तो दबावात ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो, ते फारच कौतुकास्पद असल्याचे मॅक्सवेल म्हणाला. शमीने यंदाच्या मोसमात १० सामन्यांत १६ विकेट घेतल्या असून १० पेक्षा अधिक विकेट घेणारा तो पंजाबचा एकमेव गोलंदाज आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -