घरक्रीडा'बर्थ डे बॉय' युवराज सिंगची २५ कॅन्सरग्रस्त मुलांना मदत

‘बर्थ डे बॉय’ युवराज सिंगची २५ कॅन्सरग्रस्त मुलांना मदत

Subscribe

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आज ३७ वर्षांचा झाला. त्यानिमित्त त्याने २५ कॅन्सरग्रस्त मुलांना मदतीचा हात पुढे केला आहे.

‘सिक्सर किंग’ युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. युवराजने क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेरही अनेक आव्हानांवर मात केली आहे. भारताने २०११ मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपमध्ये युवराजला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार मिळाला होता. पण वर्ल्ड कपदरम्यानच त्याला श्वास घेण्यास त्रास आणि उलट्या होत होत्या. पण तरीही तो पूर्ण वर्ल्ड कप खेळाला आणि त्यानंतर त्याला कॅन्सर झाला असल्याचे कळले. मग त्याने अमेरिकेत जाऊन उपचार घेतले. हा काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. पण त्याने आपली जिद्द सोडली नाही. तो बरा झाला आणि त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तो स्वतः या परिस्थितून गेला असल्याने त्याला उपचारादरम्यानचा काळ किती कठीण असतो हे माहित होते. तसेच या उपचारांसाठी खर्चही खूप होतो. या सर्व गोष्टी युवराजला माहिती असल्यामुळे त्याने ‘युव्हीकॅन’ नावाची चॅरिटी सुरु केली. ज्यातून तो कॅन्सरच्या उपचारांचा खर्च न करू शकणाऱ्यांना मदत करतो. आजही त्याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने २५ कॅन्सरग्रस्त मुलांना मदतीचा हात पुढे केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -