मीटूचे वादळ क्रिकेटच्या मैदानात

Mumbai
metoo
MeToo

मीटूचे वादळ भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यातही घोंगावलेले पाहायला मिळाले. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या स्कॉट कॅगीलेन विरोधात काही प्रेक्षकांनी पोस्टरबाजी केली. ईडन पार्क येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रेक्षकांमध्ये एका महिलेच्या हातात मीटूचे पोस्टर दिसत होते आणि कॅगीलेन जेव्हा फलंदाजीला आला त्यावेळी काही प्रेक्षकांनी विरोधात घोषणाबाजीही केली.

‘‘Wake up New Zealand Cricket, #MeToo’’ असे या पोस्टरवर लिहीले होते. हे पोस्टर कॅगीलेनच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. त्याच्यावर दोन वर्षांपूर्वी बलात्काराचा आरोप झाला होता. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यातही कॅगिलेनला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. कॅगीलेनवर बलात्काराचा आरोप झाला होता आणि फेब्रुवारी 2017 मध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली होती.

कॅगीलेनने आतापर्यंत दोन वन-डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. 17 मे 2015 साली हॅमिल्टन येथील एका फ्लॅटमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप कॅगीलेन याच्यावर करण्यात आला होता. 2016 मध्ये यावर सुनावणी सुरू झाली आणि 2017 मध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here