घरक्रीडाऑस्ट्रेलियाला फक्त भारतच हरवू शकेल!

ऑस्ट्रेलियाला फक्त भारतच हरवू शकेल!

Subscribe

ऑस्ट्रेलियाने नुकत्याच झालेल्या टी-२० आणि कसोटी या दोन्ही मालिकांमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवला. खासकरून ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगलेच सतावले. त्यांनी सोमवारी अ‍ॅडलेड येथे झालेला दुसरा सामना जिंकत कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवले. या विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने ऑस्ट्रेलियन संघाचे कौतुक केले. तसेच या संघाला घरच्या मैदानावर केवळ विराट कोहलीचा भारतीय संघच पराभूत करू शकेल, असे मतही त्याने व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियन संघाला या परिस्थितीत, त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे फार अवघड आहे. सध्या केवळ भारतीय संघातच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याची क्षमता आहे, असे वॉनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड येथे झालेला पाकिस्तानविरुद्धचा डे-नाईट कसोटी सामना एक डाव आणि ४८ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सहा डे-नाईट कसोटी सामने खेळले असून सहाही सामने जिंकले आहेत.

- Advertisement -

दुसरीकडे भारताने नुकताच आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध खेळला होता. या दोन संघांमध्ये पुढील वर्षी डे-नाईट कसोटी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारताने यावर्षीच्या सुरुवातीला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -