घरक्रीडाफक्त पंतवर लक्ष केंद्रित करणे धोक्याचे !

फक्त पंतवर लक्ष केंद्रित करणे धोक्याचे !

Subscribe

दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतने उत्कृष्ट खेळी करत मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात २७ चेंडूंत ७८ धावांची खेळी केली. त्याने अशी खेळी केली असली तरी फक्त त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे आमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते, असे मत चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याने व्यक्त केले. आयपीएलमध्ये दिल्ली आणि चेन्नई यांच्यात मंगळवारी सामना होणार आहे. या दोन्ही संघांनी स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे.

या स्पर्धेत अनेक असे खेळाडू आहेत, ज्यांचा तुम्हाला आदर करावाच लागतो. पंत हा त्यातीलच एक खेळाडू आहे, पण आम्ही त्याच्यासाठी गरजेपेक्षा जास्त योजना करणार नाही. तो भारतीय क्रिकेटसाठी एक अप्रतिम युवा खेळाडू आहे, पण दिल्लीकडे शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, कॉलिन इंग्राम असे बरेच चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या खेळात काय कमी शोधणे ही एक गोष्ट आहे. मात्र, त्याचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे. तुम्ही स्वतःमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे फ्लेमिंग म्हणाला.

- Advertisement -

तसेच चेन्नईचा कर्णधार आणि भारताचा महान खेळाडू महेंद्रसिंग धोनी आयपीएलनंतर होणारा विश्वचषक खेळून निवृत्त होईल, अशी चर्चा आहे. मात्र, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला, तरी त्याने आयपीएलमध्ये खेळत रहावे असे फ्लेमिंगला वाटते. मी आशा करत होतो की धोनी विश्वचषकात खेळेल आणि तसे होणार आहे. त्यानंतर तो काय करणार याबाबत आम्ही चर्चा केलेली नाही. मला वाटते की त्याने चेन्नईसाठी खेळत राहिले पाहिजे. तो चांगला सराव करत आहे, चांगला खेळत आहे आणि खेळण्याचा आनंद घेत आहे, जे सर्वात महत्त्वाचे आहे, असे फ्लेमिंग म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -